काॅंग्रेसच्या काळात अर्थव्यवस्थाच आयसीयूमध्ये हाेती : अर्थमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:41 AM2022-12-13T05:41:54+5:302022-12-13T05:42:25+5:30
दुबळ्या रुपयावरून लोकसभेत विरोधकांना प्रत्त्युत्तर
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेवर लाेकसभेत झालेल्या चर्चेत विराेधकांनी घसरलेल्या रुपयाबाबत प्रश्न विचारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर, संसदेतील काही लाेक वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळत असल्याचे प्रत्युत्तर देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हल्ला परतावून लावला.
काॅंग्रेसचे खासदार रेवंथ रेड्डी यांनी रुपयावरून सरकारवर टीका केली. काॅंग्रेस सरकारच्या काळात रुपयाचे मूल्य ६६ रुपये प्रती डाॅलर्स एवढे हाेते. त्यावेळी रुपया आयसीयूमध्ये गेल्याची ओरड भाजपकडून व्हायची. आता तर रुपया थेट शवागृहात गेला आहे. त्याला ठीक करण्यासाठी काही याेजना आहे का? असा सवाल रेड्डी यांनी केला.
कागदपत्रे मिळाल्यावर जीएसटीच्या रकमेचा निकाल
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संबंधित राज्य सरकारांचे दावे संबंधित महालेखापालांकडून प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर निकाली काढले जातील, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले.
चांगल्या अर्थव्यवस्थेवर ते जळतात
काॅंग्रेसच्या काळात रुपयाच नव्हे, तर पूर्ण अर्थव्यवस्थाच आयसीयूमध्ये हाेती. काेराेना महामारी, रशिया-युक्रेन युद्धानंतरही भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. संसदेत बसलेले काही लाेक यावर जळतात आणि त्यांना त्रास हाेताे. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेबाबत अभिमान वाटायला हवा. त्यावरून खिल्ली उडवायला नकाे.
- निर्मला सीतारमण, अर्थमंत्री