लॉटरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे अनेक राज्यांमध्ये छापे, कोट्यवधी रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 09:45 PM2024-11-18T21:45:22+5:302024-11-18T21:46:15+5:30

ईडीने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय, पंजाबमधील 22 ठिकाणी छापे टाकले.

ED action in money laundering case related to lottery; Raids in several states, seizure of crores of rupees | लॉटरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे अनेक राज्यांमध्ये छापे, कोट्यवधी रुपये जप्त

लॉटरीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे अनेक राज्यांमध्ये छापे, कोट्यवधी रुपये जप्त

Lottery King Santiago Martin: लॉटरी तिकिटांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मेघालय राज्य लॉटरीच्या संचालकाच्या तक्रारीवरून मेघालय पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. या एफआयआरवर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. यादरम्यान, ईडीने सँटियागो मार्टिन आणि त्याची कंपनी मेसर्स फ्यूचर गेमिंगच्या चौकशीदरम्यान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाबमध्ये 22 ठिकाणी छापेमारी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने या लॉटरीच्या तिकिटे छापल्या जात असलेल्या चार प्रिंटिंग प्रेसवरही छापे टाकले आहेत. बनावट लॉटरीची तिकिटेही जप्त करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर जिंकलेल्या रकमेतही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. रोखीने तिकीट खरेदी करून मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्यात येत असल्याचेही ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

622 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त 
तपासात आणखी एक गोष्ट समोर आली की, लॉटरीची 90% तिकिटे ₹ 6 च्या दर्शनी किमतीला विकली गेली, ज्यामध्ये बक्षीस रक्कम ₹ 10,000 पेक्षा कमी होती. या रकमेवर कोणताही कर नव्हता. सुरुवातीच्या तपासात ईडीला असे आढळून आले आहे की, मार्टिन सँटियागो आणि त्यांच्या कंपन्यांनी या लॉटरी व्यवसायात 920 कोटी रुपयांचा काळा पैसा कमावला असून त्यापैकी 622 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नव्याने छापे टाकले
गुरूवारी (15 नोव्हेंबर) ईडीने चेन्नईच्या सँटियागो मार्टिनवर मोठी कारवाई केली आणि देशभरातील राज्यांमध्ये त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. सँटियागो मार्टिन हा 1,300 कोटींहून अधिक किमतीचे निवडणूक रोखे घेणारा सर्वात मोठे देणगीदार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे.
 

Web Title: ED action in money laundering case related to lottery; Raids in several states, seizure of crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.