मनी लाँड्रिंग: ED ची मोठी कारवाई; अभिनेता Dino Morea, दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 09:08 PM2021-07-02T21:08:39+5:302021-07-02T21:11:58+5:30
Assets Of Actor Dino Morea, Ahmed Patel's Son-In-Law Seized In Fraud Case: गुजरातमधील व्यापारी संदेसारा बंधूंनी केलेल्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता दिनो मोरया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती सक्तवसूली संचलनालयानं जप्त केली आहे. गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेक समुहाशी निगडीत एका घोटाळ्याप्रकरणी ईडीद्वारे ही कारवाई करण्यात आली. गुजरातमधील व्यावसायीक संदेसारा बंधुंच्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
पीएमएलए कायद्याअंतर्गत चार लोकांची संपत्ती जप्त करण्याचे सुरूवातीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सक्तवसूली संचलनालयानं दिली आहे. या संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी रूपये इतकी आहे. यामध्ये खान याच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत तीन कोटी रूपये आहे. तर दिनो मोरयाच्या संपत्तीची किंमत १.४ कोटी रूपये आणि डीजे अकील म्हणजेच अब्दुलखलील बचुअलीच्या संपत्तीची किंमत १.९८ कोटी रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी याच्या संपत्तीची किंमत २.४१ कोटी रुपये इतकी आहे.
ईडीची मोठी कारवाई! संदेसारा ग्रुप घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरया, संजय खान यांची मालमत्ता जप्त pic.twitter.com/MFGjOmhu4N
— Lokmat (@MiLOKMAT) July 2, 2021
Enforcement Directorate has provisionally attached movable & immovable properties worth Rs. 8.79 Crore under PMLA in Sandesara Group case. With this attachment, the total attachment reached to Rs 14,521.80 Crore. pic.twitter.com/8SEPTxCRZf
— ED (@dir_ed) July 2, 2021
स्टर्लिंग बायोटेक समूहाच्या फरारी प्रवर्तक नितीन सांदेसरा आणि चेतन संदेसारा यांनी या गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम चार जणांना दिली असल्याचं ईडीनं सांगितलं. नितीन संदेसारा, चेन संदेसारा, त्याची पत्नी दीप्ती संदेसारा आणि हितेश पटेल या चौघांना फरार आर्थिक अधिकारी घोषित केलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरण स्टर्लिंग बायोटेक आणि मुख्य प्रवर्तक तसंच संचालकांनी केलेल्या १४,५०० कोटी रुपयांच्या बँक फसवणूकीशी संबंधित आहे.