ED चे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला; राहुल नवीन यांच्याकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:30 PM2023-09-15T21:30:12+5:302023-09-15T21:30:21+5:30

New ED Director: अंमलबजावणी संचालनालय(ED) प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज(15 सप्टेंबर) रोजी संपत आहे.

ED Director: ED chief Sanjay Kumar Mishra's tenure ends; Rahul Naveen will be the Executive Director | ED चे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला; राहुल नवीन यांच्याकडे जबाबदारी

ED चे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपला; राहुल नवीन यांच्याकडे जबाबदारी

googlenewsNext

Rahul Navin New ED Director: अंमलबजावणी संचालनालय(ED) प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ आज, म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी संपत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची ईडीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. कार्यकारी संचालकांचा आदेश शुक्रवारी रात्री उशिरा किंवा उद्या शनिवारी सकाळी औपचारिकपणे येण्याची शक्यता आहे. संजय कुमार मिश्रा यांनी सुमारे 4 वर्षे 10 महिने ईडीचे संचालक म्हणून काम केले.

कोण आहेत राहुल नवीन?
राहुल नवीन हे 1993 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. विशेष संचालक असण्याव्यतिरिक्त, राहुल नवीन ईडी मुख्यालयात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम करतात. रिपोर्टनुसार, नव्या संचालकाची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी संचालकपदाची जबाबदारी पार पाडतील.

एसके मिश्रा यांना तीन वेळा मुदतवाढ 
संजय कुमार मिश्रा यांची 2018 मध्ये ईडी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपणार होता. केंद्राने त्यांना तीन वेळा सेवेत मुदतवाढ दिली. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते.

न्यायालयाने विस्तार बेकायदेशीर ठरवला 
संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी CVC कायद्यातही सुधारणा करण्यात आली. गेल्या जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने संजय कुमार मिश्रा यांची तिसरी मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली होती. त्यांना 31 जुलैपर्यंत पद सोडावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत या पदावर कायम राहण्याची परवानगी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांना15 सप्टेंबरपर्यंत पदावर राहण्यास परवानगी दिली.

Web Title: ED Director: ED chief Sanjay Kumar Mishra's tenure ends; Rahul Naveen will be the Executive Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.