आपचे खासदार संजय सिंह यांना ५ दिवसांची ईडी कोठडी; बऱ्याच युक्तीवादानंतर कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:50 PM2023-10-05T18:50:58+5:302023-10-05T18:51:30+5:30
आपचे खासदार संजय सिंह यांच्या वतीने वरिष्ठ वकील मोहित माथूर यांनी कोठडीच्या मागणीला विरोध केला.
दिल्ली अबकारी घोटाळ्यात आपचे खासदार संजय सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाने ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने दहा दिवसांची कोठडी मागितली होती. परंतू, त्यावर कोर्टानेच प्रश्न उपस्थित करत निर्णय दिला आहे.
संजय सिंह यांचा मोबाईल ताब्यात घेतलेला असताना आता त्यांची कोठडी कशासाठी हवीय, असा सवाल कोर्टाने ईडीला विचारला होता. यावर ईडीने पैशांच्या देवानघेवाणीचा हवाला देत ही रक्कम दोन कोटींची आहे. तसेच संजय सिंह यांचा कर्मचारी सर्वेश मिश्र याने या व्यवहाराची कबुली दिली आहे. सरकारी साक्षीदार बनलेल्या दिनेश अरोडा यानेच सिंह यांना फोन करून पैसे मिळाले का, हे कन्फर्म केले होते.
याचबरोब ईडीने आणखी तीन लोक आहेत, ज्यांची चौकशी करायची आहे. सिंह यांच्यासोबत त्यांची चौकशी करायची आहे, असे ईडीने न्यायालयास सांगितले.
आपचे खासदार संजय सिंह यांच्या वतीने वरिष्ठ वकील मोहित माथूर यांनी कोठडीच्या मागणीला विरोध केला. चौकशी सुरु असताना अटक कुठे असते? असा सवाल केला होता. यानंतर ईडीने सात दिवसांची कोठडी मिळाली तरी चालेल असे कोर्टाला सांगितले होते. या साऱ्या युक्तीवादानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.