काँग्रेस आमदाराला ईडीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 03:53 AM2019-09-18T03:53:20+5:302019-09-18T03:53:28+5:30
बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे.
बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. हेब्बाळकर यांची गुरुवारी (१९ सप्टेंबर) दिल्लीमध्ये चौकशी केली जाणार आहे. हेब्बाळकर या माजी मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थक आहेत.
बेकायदेशीर मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी शिवकुमार यांना अटक करण्यात आली असून त्यांची दिल्लीत चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात लक्ष्मी हेब्बाळकर यांचीही चौकशी होणार आहे.
कर्नाटकात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शिवकुमार यांच्यावर आयकर खात्याने छापा टाकला होता. त्यानंतर लगेच आयकर विभागाने लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगाव येथील निवासस्थानीदेखील छापा टाकला होता. आयकर खात्यानंतर ईडीनेदेखील लक्ष्मी यांची चौकशी सुरू केली आहे.
शिवकुमार यांच्या अटकेनंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हेब्बाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा
निषेध केला होता. याशिवाय
ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी शिवकुमार यांनी हेब्बाळकर यांच्याशी फोनवरून संभाषण केल्याचा संशय आल्याने ईडी अधिकाऱ्यांनी हेब्बाळकर यांची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.