मल्ल्या यांना ईडीची नोटीस
By admin | Published: March 19, 2016 02:12 AM2016-03-19T02:12:12+5:302016-03-19T02:12:12+5:30
मद्य उद्योगपती विजय मल्ल्या यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ मार्च रोजी नव्याने बजावलेल्या नोटिसीनुसार दोन एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले.
मुंबई : मद्य उद्योगपती विजय मल्ल्या यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ मार्च रोजी नव्याने बजावलेल्या नोटिसीनुसार दोन एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले.
यापूर्वी ईडीने मल्ल्या यांना किंगफिशर एअरलाईन्सच्या (केएफए) ९०० कोटी रुपयांच्या प्रकरणात १८ मार्च हजर राहण्याचे समन्स बजावले होते. केएफएच्या कर्जाच्या प्रत्येक बाजुची तपासणी व आयडीबीआय बँकेने दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू आहेच. सेबीकडून अहवालही मागितले आहेत. आम्ही केंद्रीय गुप्तचर खात्याशी (सीबीआय) रोजच्या रोज समन्वय राखून आहोत, असे ईडीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
- विलेपार्ले येथील किंगफिशर हाउसचा ९२ लाख रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे. आता या मालमत्तेचा लिलाव बँका करीत असल्याने त्यातून थकीत रक्कम वसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़