२० लाखांची लाच घेताना ईडीचा अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 08:27 IST2023-12-02T08:25:46+5:302023-12-02T08:27:43+5:30
ED officer arrest: राजस्थाननंतर तमिळनाडूमध्ये आणखी एक अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी अंकित तिवारीला एका डॉक्टराकडून २० लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

२० लाखांची लाच घेताना ईडीचा अधिकारी अटकेत
चेन्नई : राजस्थाननंतर तमिळनाडूमध्ये आणखी एक अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी अंकित तिवारीला एका डॉक्टराकडून २० लाखांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
अंकित तिवारी आपल्या ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत अनेक लोकांना धमकावत होता आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयात सुरू असलेला खटला बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत होता.
तमिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने (डीव्हीएसी) शुक्रवारी सकाळी अंकित तिवारीला ताब्यात घेतले. या आरोपांवर ईडीने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी अंकित तिवारीचे ओळखपत्र सादर केले. ते डिसेंबर २०२४ पर्यंत वैध आहे.