बीआरएस नेत्या के कविता यांनी AAP नेत्यांना 100 कोटी रुपये दिले, EDचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 08:13 PM2024-03-18T20:13:49+5:302024-03-18T20:14:44+5:30
ED On K Kavita: अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली मद्य घोटाळ्यात मोठा दावा केला आहे.
ED On K Kavitha Arvind Kejriwal: दिल्ली मद्य घोटाळ्यात अडकलेल्या BRS नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी, के कविता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दावा केला आहे की, कविता यांनी मोठा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या (AAP) प्रमुख नेत्यांसोबत डील केली. या अंतर्गत कविता यांनी आप नेत्यांना 100 कोटी रुपये दिले.
K Kavitha allegedly conspired with Kejriwal, Sisodia, other AAP leaders for favours in Delhi Excise policy formulation, paid Rs 100 cr, claims ED
— ANI Digital (@ani_digital) March 18, 2024
Read @ANI Story | https://t.co/YwDHkomiA7#KKavitha#ArvindKejriwal#DelhiExcisePolicy#EDpic.twitter.com/xuJJQ2xoGL
ईडीने कविता यांना 15 मार्च रोजी हैदराबादेतील राहत्या घरातून अटक करुन दिल्लीत आणले आहे. त्यावेली ईडीने दावा केला होता की, कविता यांचा मद्य व्यापाऱ्यांची लॉबी 'साउथ ग्रुप'शी संबंध आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, 2021-22 च्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामध्ये लॉबी मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत होती. हे धोरण आता रद्द करण्यात आले आहे. या प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या सहकार्याने 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा केंद्रीय एजन्सीचा आरोप आहे.
245 ठिकाणी छापे, पंधरा जणांना अटक
या प्रकरणात ईडीने दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, मुंबईसह देशभरात 245 ठिकाणी छापे टाकले आहेत. आतापर्यंत आप नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि विजय नायर यांच्यासह पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने सोमवारी सांगितले की, गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी आतापर्यंत 128.79 कोटी रुपयांची मालमत्ता सापडली आहे.