'ईडी'ने शाहरूखला बजावले समन्स
By admin | Published: October 27, 2015 11:03 AM2015-10-27T11:03:26+5:302015-10-27T12:45:12+5:30
फेमा कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी बॉलिवूड अभिनेता व आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानला अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - ' फेमा' कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा मालक शाहरुख खानला अमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) समन्स बजावले आहे. नाईट रायडर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (KRSPL) शेअर्स खरेदी प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला असून याप्रकरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच ईडीच्या मुंबई ऑफीसमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश शाहरूखला देण्यात आले आहेत.
आयपीएलच्या या फ्रॅन्चायझीचा मालकी अधिकार शाहरुखच्या 'रेड चिलीज' कंपनीकडे असून त्यात अभिनेत्री जुही चावलाचा पती जय मेहता याचीही भागीदारी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे शेअर सहा ते आठ पट कमी किंमतीत विकून त्याद्वारे परकीय चलनात फायदा कमावल्याचा आरोप आशहरुखवर लावण्यात आला आहे. जय मेहताची परदेशी कंपनी सी आयलॅण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसोबत झालेल्या एका हस्तांतरण व्यवहारात या शेअर्सचं मूल्य कमी दाखवून कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेने परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.