आयएएस अधिकाऱ्याच्या घरात पैशांची खाण; नोटा मोजता मोजता मशीन गरम झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:42 PM2022-05-06T19:42:11+5:302022-05-06T19:52:30+5:30

खाण सचिवांकडे सापडली पैशांची खाण; रोकड मोजून ईडीचे अधिकारी दमले

Ed Raids Jharkhand Mining Secretary Residence Know About Ias Pooja Singhal | आयएएस अधिकाऱ्याच्या घरात पैशांची खाण; नोटा मोजता मोजता मशीन गरम झाल्या

आयएएस अधिकाऱ्याच्या घरात पैशांची खाण; नोटा मोजता मोजता मशीन गरम झाल्या

Next

रांची: झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या २० ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे ५ वाजता छापे टाकण्यास सुरुवात केली. यादरम्यान सिंघल यांच्याशी संबंधित सीएकडून २५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याच्या मशीन्स आणल्या. जप्त रकमेबद्दलची अधिकृत माहिती ईडीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. 

पूजा सिंघल यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रं मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ईडीच्या पथकांकडून रांचीच्या कांके रोड येथील चांदनी चौक परिसरातील पंचवटी रेसिडेन्सीच्या ब्लॉक क्रमांक ९, लालपूरच्या हरिओम टॉवर आणि बरियातूमधील पल्स रुग्णालयात छापासत्र सुरू आहे. पल्स रुग्णालय पूजा सिंघल यांचे पती आणि व्यवसायिक अभिषेक झा यांचं आहे. पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आहे.

पूजा सिंघल झारखंडच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सध्या उद्योग सचिव आणि खाण सचिव पदाचा प्रभार आहे. यासोबतच पूजा यांच्याकडे झारखंड राज्य खनिज विकास निगमच्या चेअरमन पदाची जबाबदारी आहे. राज्यात भाजपचं सरकार असताना त्या कृषी सचिव पदावर कार्यरत होत्या. मनरेगा घोटाळा उघडकीस आला, त्यावेळी त्या डीसी पदावर तैनात होत्या.

Web Title: Ed Raids Jharkhand Mining Secretary Residence Know About Ias Pooja Singhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.