Amanatullah Khan : आपचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर; आमदार अमानतुल्ला यांच्या घरावर छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 09:21 IST2023-10-10T09:10:10+5:302023-10-10T09:21:27+5:30
AAP MLA Amanatullah Khan : दिल्लीतील आप नेते आणि आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीने छापा टाकला.

Amanatullah Khan : आपचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर; आमदार अमानतुल्ला यांच्या घरावर छापेमारी
आम आदमी पक्षाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर आला आहे. मंगळवारी दिल्लीतील आप नेते आणि आमदार अमानतुल्ला खान (AAP MLA Amanatullah Khan) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. तपास पथक येथे शोध घेत आहे. ACB ने दिल्ली वक्फ बोर्डाच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार आणि इतर अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात अमानतुल्लाह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. एफआयआरच्या आधारे ईडीने अमानतुल्ला यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे.
अमानतुल्ला खान यांनी दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना नियमांचे उल्लंघन करून 32 जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओंनी अशा बेकायदेशीर भरतीविरोधात निवेदन जारी केले होते. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष या नात्याने अमानतुल्ला खान यांनी भ्रष्टाचार आणि पक्षपात केल्याचा आरोप आहे.
#WATCH | Delhi: Enforcement Directorate (ED) raids underway at the premises of Aam Aadmi Party (AAP) MLA Amanatullah Khan in connection with a money laundering case. pic.twitter.com/aFbcIz0xPe
— ANI (@ANI) October 10, 2023
यासोबतच दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामध्ये दिल्ली सरकारच्या अनुदानाचा समावेश आहे. या संदर्भात ACB ने सप्टेंबर 2022 मध्ये अमानतुल्ला यांची चौकशी केली. त्यानंतर माहितीच्या आधारे चार ठिकाणी छापे टाकण्यात आले.
सुमारे 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. याशिवाय दोन बेकायदेशीर व विना परवाना पिस्तुल सापडले. काडतुसे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला होता. नंतर अमानतुल्ला यांना अटक करण्यात आली होती. पुरावे आणि आक्षेपार्ह साहित्याच्या आधारे त्यांना ही अटक करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.