अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:29 PM2023-10-30T22:29:28+5:302023-10-30T22:39:09+5:30

यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते.

ED summons Delhi CM Arvind Kejriwal in Delhi excise policy case | अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नवीन मद्य धोरणाबाबत ईडी केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी १६ एप्रिल रोजी सीबीआयने कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची नऊ तास चौकशी केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे.

सीबीआयच्या नऊ तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. त्यांना (केंद्राला) आपचा नाश करायचा आहे. मात्र देशातील जनता आमच्यासोबत आहे. दारू घोटाळा पूर्णपणे बनावट असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले होते. केजरीवाल यांना मिळालेल्या या नोटीसनंतर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, केंद्र सरकारच्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला समन्स बजावले आहे. भाजपाला कोणत्याही किंमतीत 'आप'ला चिरडायचे आहे, हे स्पष्ट आहे. त्यांना अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अटक अडकवून अटक करायची आहे, असा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

Web Title: ED summons Delhi CM Arvind Kejriwal in Delhi excise policy case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.