"ज्यांनी ज्यांनी चोरी केली, त्यांना उत्तर द्यावं लागेल"; ED समन्सवर वीरेंद्र सचदेवांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 01:43 PM2024-03-30T13:43:21+5:302024-03-30T13:45:51+5:30
AAP Virendra Sachdeva : दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा आपवर हल्लाबोल केला आहे.
ईडीने दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना समन्स बजावून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. यानंतर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा आपवर हल्लाबोल केला आहे. "दिल्ली घोटाळ्यात आपचे अनेक नेते सहभागी आहेत. यामध्ये ज्यांनी ज्यांनी चोरी केली आहे, त्यांना उत्तर द्यावंच लागेल" असं म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असं ते म्हणाले. "खरं तर स्वतः अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता, पण 'आप'चे चारित्र्य असं आहे की त्यात नैतिकता नावाची कोणतीच गोष्ट नाही. या प्रकरणात तपास यंत्रणा आपलं काम करत आहे. न्यायालयात जो निर्णय येईल त्याचे स्वागत केले जाईल" असंही सांगितलं.
#WATCH दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा ने कहा, "वैसे तो अरविंद केजरीवाल को खुद नैतिकता के आधार पर इस्तीफा देना चाहिए था लेकिन AAP का चरित्र ऐसा है कि उसमें नैतिकता नाम की कोई चीज है नहीं... जांच एजेंसी अपना काम कर रही है। न्यायालय अपनी समीक्षा करेगा और जो निर्णय आएगा उसका… pic.twitter.com/nxguzKG2gh
— ANI_HindiNews (@AHindinews) March 30, 2024
याआधी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली म्हणाले होते की, ही एक फॅशन झाली आहे, जोपर्यंत ईडी समन्स पाठवत नाही तोपर्यंत त्यांना अन्न पचत नाही. कैलाश गेहलोत यांना समन्स पाठवल्यावर पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले, "तपास यंत्रणा नियमितपणे समन्स जारी करत असतात. त्यांना दररोज समन्स बजावले जातात. ईडी आणि सीबीआय रोज समन्स देतात. भाजपाला समन्स पाठवायचे आहेत, जेव्हा पाठवायचं आहे तेव्हा ते पाठवतात."