मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचवे समन्स! आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:38 AM2024-01-18T11:38:35+5:302024-01-18T11:40:00+5:30
दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आजपासून ३ दिवसांसाठी गोव्याला जात आहेत, यामुळे ते आजही ईडीसमोर हजर होऊ शकत नाहीत असं बोलले जात आहे. ईडीने आता पाचवे समन्स जारी केले असून केजरीवाल यांना उद्या १९ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.
'आप'शी संबंधित सूत्रांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल तीन दिवसीय गोवा दौऱ्यावर जात आहेत. अशा परिस्थितीत ते ईडीसमोर हजर होण्याची शक्यता नाही. सीएम केजरीवाल याआधी ११ जानेवारीला दोन दिवसांसाठी गोव्याला जाणार होते, पण दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीमुळे त्यांना हा दौरा पुढे ढकलावा लागला.
ईडीने यापूर्वी ५५ वर्षीय केजरीवाल यांना २ नोव्हेंबर, २२ डिसेंबर आणि ३ जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, तीनही वेळा तो ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशा स्थितीत ईडीने चौथा समन्स जारी करून त्यांना १८ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले होते.