कार्ती यांच्या दहा ठिकाणांवर ईडीचे छापे, पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:16 AM2018-01-14T01:16:33+5:302018-01-14T01:16:46+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दहा ठिकाणांवर सक्तवसुुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे घातले. यात दिल्लीतील पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाच्या घटनाक्रमात ही कारवाई केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दहा ठिकाणांवर सक्तवसुुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे घातले. यात दिल्लीतील पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाच्या घटनाक्रमात ही कारवाई केली आहे.
सूत्रांनी सांगितले की, शनिवारी सकाळपासूनच कार्ती यांच्या चेन्नईतील ९ ठिकाणांवर छापेमारी सुरू झाली. याशिवाय दक्षिण दिल्लीतील जोरबागमधील निवासस्थानीही छापे मारले. ज्या ठिकाणांवर छापे मारले त्यात कार्ती यांच्याशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंट, त्यांचे सहायक व कार्ती यांचे चेन्नईतील निवासस्थान यांचा समावेश आहे. या धाडीत काही कागदपत्रे हाती लागली असल्याचा दावा सूत्रांनी केला.
ईडीला अधिकारच नाही
या छाप्यांविषयी पी. चिदंबरम म्हणाले सांगितले की, ईडीचे छापे हास्यास्पद आहेत. अधिकाºयांना त्यांच्या निवासस्थानी काहीही मिळाले नाही. ईडीच्या अधिकाºयांनी किचन आणि बाथरूममध्येही शोध घेतला; पण त्यांना काहीही सापडले नाही, असा दावा करून पी. चिदंबरम
म्हणाले की, मुळात मनी लाँड्रंग कायद्यानुसार कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार ईडीला देण्यात आलेलेच नाहीत.