'ईडीच्या समन्सचा उद्देश लोकसभा निवडणुकीपूर्वी माझी अटक'; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:00 PM2024-01-04T13:00:44+5:302024-01-04T13:01:10+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे तिसऱ्यांदा समन्स आले आहे.

'ED's summons aimed at arresting me before Lok Sabha polls' Chief Minister Kejriwal's allegation | 'ईडीच्या समन्सचा उद्देश लोकसभा निवडणुकीपूर्वी माझी अटक'; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप

'ईडीच्या समन्सचा उद्देश लोकसभा निवडणुकीपूर्वी माझी अटक'; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आरोप

मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. या प्रकरणी आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भाजपवर आरोप केले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, सत्य हे आहे की कोणताही घोटाळा झालेला नाही. हे समन्स बेकायदेशीर आहे. हे माझ्या वकिलांनी मला सांगितले.भाजपचा उद्देश तपास करणे नाही, असा आरोपही केजरीवाल यांनी भाजपवर केला.

"भाजपला माझी बदनामी करायची आहे, त्यांना माझ्या प्रामाणिकपणावर हल्ला करायचा आहे. माझे वकील या समन्सला बेकायदेशीर म्हणतात. मी ईडीला सांगितले की समन्स बेकायदेशीर आहे. मी बेकायदेशीर समन्सचे पालन करावे का कायदेशीरदृष्ट्या योग्य समन्स आल्यास मी सहकार्य करेन, असंही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल सरकारच्या अडचणी पुन्हा वाढणार? आणखी एका प्रकरणात CBI चौकशीची शिफारस

सीएम केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी मला बोलावले जात आहे. सीबीआयने मला ८ महिन्यांपूर्वी बोलावले होते, मी गेलो होतो. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी बोलावत आहे. मला लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता येणार येऊ नये म्हणून चौकशीच्या बहाण्याने मला बोलावून अटक करण्याचा भाजपचा उद्देश आहे, असंही केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज भाजप इतर पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडी आणि सीबीआय तपास करते आणि नंतर त्यांना भाजपमध्ये समाविष्ट करून प्रकरण शांत करते. जो भाजपात सामील होत नाही तो तुरुंगात जातो. मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि विजय नायर भाजपमध्ये प्रवेश करत नसतील तर ते तुरुंगात आहेत. आम्ही भ्रष्टाचार केला नाही. असा देश प्रगती करू शकत नाही. काय चाललंय? लोकशाहीसाठी हे चुकीचे आहे. हे थांबवायला हवे. माझे तन, मन आणि धन देशासाठी आहे. माझ्या श्वासाचा प्रत्येक थेंब आणि रक्त देशासाठी आहे. मला तुमची साथ हवी आहे.

यापूर्वी, दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी दावा केला होता की, ईडी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते. मात्र, त्याचे दावे साफ फेटाळण्यात आले. सीएम केजरीवाल यांना अटक करण्याचा ईडीचा कोणताही इरादा नसल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी सकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कडक बंदोबस्त ठेवला असला तरी नंतर तो शिथिल केला. 

Web Title: 'ED's summons aimed at arresting me before Lok Sabha polls' Chief Minister Kejriwal's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.