देशातील सुशिक्षित बेरोजगार वाढले, राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 07:50 AM2019-02-19T07:50:48+5:302019-02-19T07:51:31+5:30
‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’ची माहिती : २०१७-१८मधील परिस्थिती
नवी दिल्ली : कमी शिक्षण असलेल्या लोकांच्या तुलनेत २०१७-१८मध्ये शिक्षित लोकांमधील बेरोजगारी अधिक प्रमाणात वाढली असल्याचे सर्वेक्षण समोर आले आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने (एनएसएसओ) ही माहिती दिली आहे.
या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, २०१७-१८मध्ये कौशल्यप्राप्त लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्या तुलनेत २०११-१२मध्ये कौशल्यप्राप्त लोकांची संख्या कमी होती. या सर्वेक्षणातून असेही संकेत मिळत आहेत की, २०१७-१८मध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक होते. विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक होते, जिथे तरुण महिलांना पुरुषांच्या तुलनेत शिक्षणाची अधिक संधी मिळाली.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर आॅफ इन्फॉर्मल सेक्टर अँड लेबर स्टडिजचे अध्यक्ष संतोष मल्होत्रा म्हणाले की, १५-१६ वर्षाच्या वर्गातील एकूण माध्यमिक नोंदणी दर २०१० मधील ५८ टक्क्यांवरून २०१६ मध्ये ९० टक्क्यांवर गेला आहे.
बिगर कृषी क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्यात यशस्वी न ठरणारे लोक बेरोजगार राहू शकतात. २००४-०५ आणि २०११-१२च्या दरम्यान बिगर कृषी रोजगार वाढत होते. म्हणून बेरोजगारीचा दर घटत होता. ज्या तरुणांनी औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची संख्या २०११-१२ मध्ये २.४ टक्के होती. ती २०१७-१८ मध्ये २.५ टक्के झाली. याशिवाय २.२ टक्के लोकांनी नोकरी करत असतानाच व्यावसायिक शिक्षण घेतले, तर १.८ टक्के लोकांनी स्वत:च कौशल्य आत्मसात केले.
हाताला काम नसणाऱ्यांचे प्रमाण असे वाढले
२०१७-१८
मध्ये विशेषत: ग्रामीण भागातील साक्षरतेत सुधारणा झाली आहे.
या सर्व्हेनुसार राष्ट्रीय बेरोजगारी ६.१ टक्के होती.
२०११-१२
५.९%
२०१७-१८
१२.४ %