न्यायालयाची अधिका-याला 5 हजार झाडे लावण्याची शिक्षा

By Admin | Published: May 6, 2016 09:16 AM2016-05-06T09:16:11+5:302016-05-06T09:16:11+5:30

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आपला आदेश न मानणा-या अधिका-याला पाच हजार झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे

Education of 5000 trees for the court officer | न्यायालयाची अधिका-याला 5 हजार झाडे लावण्याची शिक्षा

न्यायालयाची अधिका-याला 5 हजार झाडे लावण्याची शिक्षा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
चंदिगड, दि. 06 - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आपला आदेश न मानणा-या अधिका-याला पाच हजार झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी आर एस खारब यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन न केल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. राज्यातील शाळांच्या आवारात ही झाडं लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
 
आर एस खाबर यांनी न्यायालयाने काही चित्रकला शिक्षकांना प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र खारब यांनी आदेशाचं पालन केलं नाही ज्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ही शिक्षा सुनावली आहे. 
 
पावसाळ्याच्या सुरुवातीला ही झाडं लावावीत आणि त्याची सविस्तर माहिती न्यायालयात द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 'सुधारित उपाय करण्यासाठी आदेश दिला आहे. जेणेकरुन अधिका-याला अपली चूक लक्षात यावी', असं न्यायाधीस गगनदीप यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Education of 5000 trees for the court officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.