वाळू चोरी प्रकरणात दोन्ही भावांना शिक्षा

By Admin | Published: October 25, 2016 01:59 AM2016-10-25T01:59:52+5:302016-10-25T01:59:52+5:30

जळगाव: वाळू चोरीच्या गुन्‘ात मुकुंदा बळीराम सोनवणे व आनंदा बळीराम सोनवणे (रा.आव्हाणे, ता.जळगाव) या दोन्ही भावांना न्यायालयाने सोमवारी सहा महिने कैद व दहा हजार दंड, दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. वाळू चोरी प्रकरणात शिक्षेची ही तिसरी घटना आहे.

Education for both brothers in the case of sand theft | वाळू चोरी प्रकरणात दोन्ही भावांना शिक्षा

वाळू चोरी प्रकरणात दोन्ही भावांना शिक्षा

googlenewsNext
गाव: वाळू चोरीच्या गुन्‘ात मुकुंदा बळीराम सोनवणे व आनंदा बळीराम सोनवणे (रा.आव्हाणे, ता.जळगाव) या दोन्ही भावांना न्यायालयाने सोमवारी सहा महिने कैद व दहा हजार दंड, दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. वाळू चोरी प्रकरणात शिक्षेची ही तिसरी घटना आहे.
तालुक्यातील आव्हाणे गावाजवळ जि.प.शाळेजवळ ६ जानेवारी २०१५ रोजी रात्री साडे अकरा वाजता तलाठी मोहन पुंडलिक सोनार यांनी अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे डंपर (क्र.एम.एच.१९ ए.एल.२२६३) पकडले होते. मुकुंदा सोनवणे हा डंपर चालक तर आनंदा सोनवणे हा मालक होता. सोनार यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी राजेंद्र बोरसे व जितेंद्र पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे ॲड.अनिल गायकवाड तर आरोपीतर्फे ॲड.गणेश सोनवणे यांनी काम पाहिले.

Web Title: Education for both brothers in the case of sand theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.