शिक्षण विभाग संचिकांच्या घोळातच
By Admin | Published: December 20, 2015 11:59 PM2015-12-20T23:59:51+5:302015-12-20T23:59:51+5:30
हंगामी वसतीगृहांच्या मान्यतेबाबत जि़प़चे प्रा़ शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेवून सांगतो अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांना वारंवार विचारले असता संचिका आता माझ्याकडे उपलब्ध नसून माहिती घेतल्यानंतरच सांगेन असेही सोनटक्के यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे एकूणच या दुष्काळी परिस्थितीत शिक्षण विभाग या विषयाला किती गांभीर्याने घेत आहे हे स्पष्ट होत आहे़
ह गामी वसतीगृहांच्या मान्यतेबाबत जि़प़चे प्रा़ शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेवून सांगतो अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांना वारंवार विचारले असता संचिका आता माझ्याकडे उपलब्ध नसून माहिती घेतल्यानंतरच सांगेन असेही सोनटक्के यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे एकूणच या दुष्काळी परिस्थितीत शिक्षण विभाग या विषयाला किती गांभीर्याने घेत आहे हे स्पष्ट होत आहे़जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याप्रकरणात शिक्षण विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले़ दुष्काळी परिस्थिती जिल्ात तत्काळ हंगामी वसतिगृह सुरू केले जातील़ शिक्षण विभागाकडून याबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबतही त्यांनी संताप व्यक्त करताना संबंधितांविरूध्द कारवाईचे निर्देश दिले जातील असे स्पष्ट केले़ चौकट - नोव्हेंबरमध्ये सुरू करायचे होते वसतिगृह़़स्थलांतरीत पालकांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतीगृह नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहेत़ मात्र जिल्ात प्रत्यक्षात डिसेंबर संपत आला असला तरी एकही हंगामी वसतिगृह सुरू झाले नाही़ विशेष म्हणजे हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या १४ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतही उपस्थित झाला होता़ सभागृहात प्रशासनाने उत्तर दिले खरे मात्र प्रत्यक्षात कार्यवाही मात्र कोणतीही झाली नसल्याची बाब पुढे आली आहे़