नरेंद्र मोदींमुळे मुस्लिम मुलीला मिळालं एज्युकेशन लोन
By admin | Published: March 23, 2017 01:21 PM2017-03-23T13:21:51+5:302017-03-23T13:21:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांच्या आत त्या मुस्लिम मुलीला प्रतिसाद दिला असून, तिला 1.5 लाखांचं एज्युकेशन लोनही मंजूर झालं
ऑनलाइन लोकमत
कर्नाटक, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. अनेकदा त्यांनी प्रसंगावधान दाखवत गरिबांना मदत केली आहे. भारतीय तरुण-तरुणींनी अधिकाधिक शिकावं यासाठी ते आग्रही असतात. त्याप्रमाणेच त्यांनी शिक्षा अभियानासारख्या अनेक योजनाही राबवल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी गरिबीमुळे एमबीएचे शिक्षण घेण्यात अडचणी येत असलेल्या 21 वर्षीय मुस्लिम युवती सारा हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शैक्षणिक कर्ज मिळावं, यासाठी त्यांना पत्र लिहिलं होतं. माझ्या वडिलांना आठ महिने पगार मिळाला नाही. त्यामुळे एमबीएची फी भरण्यासाठी मला पैशांची गरज आहे, असं तिने पत्रात नमूद केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 दिवसांच्या आत त्या मुस्लिम मुलीला प्रतिसाद दिला असून, तिला 1.5 लाखांचं एज्युकेशन लोनही मंजूर झालं आहे.
कर्नाटकमधील मांड्या येथे राहणा-या सारा या मुलीचे वडील एका कारखान्यात कामाला आहेत. मात्र कारखानदारांनी त्यांना आठ महिन्याचा पगारच दिला नाही. तिला एमबीएचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्ज हवे होते. मात्र बँकांनी तिला हप्ते भरण्यास कार्यक्षम नसल्यानं कर्ज नाकारले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना पत्र लिहून तिने मदतीची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलीची मदत केल्याने तिला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे. त्यानंतर सारा म्हणाली, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या आशेनं पत्र पाठवले होते. मात्र, त्याला एवढ्या लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून 10 दिवसांच्या आत पत्राला उत्तर दिले. मोदींच्या मदतीमुळे माझे एमबीएचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, माझे कुटुंबीयही आनंदी असल्याचे सारा म्हणाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कृतीचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
I was confident that PM will respond but did not expect it to be so fast,I got a reply in just 10 days: Sara,girl who wrote to PM #Karnatakapic.twitter.com/5WKBvWfX3V
— ANI (@ANI_news) March 23, 2017