रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना जि.प.सभापतींचे पत्र शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा : मोरझिरा शाळेला कुलूप ठोकले

By admin | Published: July 18, 2016 11:32 PM2016-07-18T23:32:14+5:302016-07-18T23:32:14+5:30

जळगाव : शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री व माजी महसूलमंत्री यांना पत्र दिले आहे.

Education Minister to fill vacant posts with letter of education to the education officer: Morozira school locked | रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना जि.प.सभापतींचे पत्र शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा : मोरझिरा शाळेला कुलूप ठोकले

रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना जि.प.सभापतींचे पत्र शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा : मोरझिरा शाळेला कुलूप ठोकले

Next
गाव : शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री व माजी महसूलमंत्री यांना पत्र दिले आहे.
यासंदर्भात धनके यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील व इतर अधिकार्‍यांशी सोमवारी दुपारी चर्चा केली. त्यात उर्दू शिक्षकांच्या रिक्त पदांच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
मोरझिरा येथे कुलूप ठोकले, लवकरच शिक्ष देणार
मोरझिरा ता.रावेर येथे उर्दू शिक्षकाचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. यासंदर्भात सभापती धनके यांच्याकडेही उर्दू शिक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. ही बाब लक्षात घेता धनके यांनी संबंधित शाळेत तातडीने शिक्षक नियुक्त करण्याची सूचना शिक्षण विभागाला केली. या शाळेत दोन दिवसात शिक्षक रूजू होईल, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले.

जि.प.च्या शाळांमध्ये उर्दू शिक्षकांची २२२ आणि मराठी शाळांमध्ये २६१ पदे रिक्त आहेत, अशी माहिती सभापती धनके यांना देण्यात आली. त्याची माहिती घेऊन धनके यांनी लागलीच शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पत्र दिले.

Web Title: Education Minister to fill vacant posts with letter of education to the education officer: Morozira school locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.