मुख्यमंत्र्यांच्या नितीचा परिणाम; ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:21 PM2023-02-28T14:21:24+5:302023-02-28T14:49:27+5:30

गावातील या सर्व ११ कुटुंबीयांतील ४३ सदस्यांचे धर्म परिवर्तन निर्वाचन क्षेत्र जगीरोड (मारीगांव) येथे करण्यात आले

Effect of Chief Minister's Policy; 11 Family homecoming to Hinduism in aasam hemant biswa sarma | मुख्यमंत्र्यांच्या नितीचा परिणाम; ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी

मुख्यमंत्र्यांच्या नितीचा परिणाम; ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी

googlenewsNext

गुवाहटी - गोभा देवराज राज परिषदेच्यावतीने तिवा भाषा संस्कृती अरु उद्योग पर्व नावाने सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ११ कुटुंबातील ४३ जणांना हिंदू धर्मात परिवर्तीत म्हणजे हिंदु धर्मात या सर्वांची घरवापसी करण्यात आली आहे. या अकरा कुटंबीयांना यापूर्वी इसाई धर्म स्वीकार केला होता. मात्र, कार्यक्रमाचे संयोजक जर्सिंग बोरोडोलोई यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही सुरू केलेल्या अभियानांतर्गत दोन्ही गावांतील लोक, आपल्या मूळ हिंदू धर्मात परत आले आहेत. 

गावातील या सर्व ११ कुटुंबीयांतील ४३ सदस्यांचे धर्म परिवर्तन निर्वाचन क्षेत्र जगीरोड (मारीगांव) येथे करण्यात आले. त्यानंतर, आसाममधील ११ कुटुंबातील या सर्वच सदस्यांची घरवापसी चर्चेचा विषय ठरली. माध्यमांत हे वृत्त झळकल्याने हा विषय राज्यात चर्चेत आहे. दरम्यान, आसामचेमुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे सातत्याने हिंदूंच्या घरवापसीसंदर्भात विधानं करत आहेत. इसाई आणि मुस्लीम धर्मांतरणाला अनुसरून सीएम सरमा ठाम असतात.

मुख्यमंत्र्यांच्या नितीमुळेच प्रभावित

भाजपा विधायक पियुष हजारिका यांनी या धर्मांतरणाबाबत दावा केला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या सरकारच्या नितीमुळेच इसाई धर्मांत गेलेल्या हिंदू कुटुंबीयांना घरवापसी केली आहे, असे म्हटले. 

Web Title: Effect of Chief Minister's Policy; 11 Family homecoming to Hinduism in aasam hemant biswa sarma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.