दिल्लीच्या विषारी हवेचा लैंगिक आरोग्यावर परिणाम

By admin | Published: November 8, 2016 02:48 PM2016-11-08T14:48:55+5:302016-11-08T19:09:26+5:30

मानवी शरीराला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. दमा, लंग कॅन्सर, ह्दयविकार या आजारांबरोबर लैंगिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.

The effect of sexual health of Delhi's toxic air | दिल्लीच्या विषारी हवेचा लैंगिक आरोग्यावर परिणाम

दिल्लीच्या विषारी हवेचा लैंगिक आरोग्यावर परिणाम

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - वाढत्या हवाई प्रदूषणामुळे मानवी शरीराला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. दमा, लंग कॅन्सर, ह्दयविकार या आजारांबरोबर लैंगिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार वाढत्या हवाई प्रदूषणाचा माणसाच्या प्रजोत्पादन क्षमतेवर परिणाम होत आहे. दिल्लीतील हवेमध्ये विषारी घटक मिसळल्यामुळे लोकांच्या लैंगिक कामक्रीडेच्या इच्छेवर परिणाम होत आहे. 
 
हवाई प्रदूषणामुळे लैंगिक कामक्रीडेमध्ये ३० टक्क्यांनी घट होते असे फर्टीलिटी तज्ञांनी सांगितले. हवेत मोठया प्रमाणावर धातूचे कण असून त्याचा थेट शरीरातील हारमोन्सवर परिणाम होतो. भारतात १५ टक्के पुरुष वंधयत्वाचा सामना करत असून, महिलांपेक्षा हा आकडा जास्त आहे असे आयव्हीएफ रुग्णालयाशी संबंधित असलेल्या फर्टीलिटी तज्ञ सागरीका अग्रवाल यांनी सांगितले. 
 
प्रदूषणाचा हार्मोन्सचे संतुलन आणि स्पर्म्सवर परिणाम होतो. शरीरातील टेस्टोस्टिरोन किंवा ओईस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्यामुळे संभोगाची इच्छा कमी होते असे अग्रवाल सांगितले. हा त्रास टाळायचा असेल तर बाहेरपडताना तोंडाला मल्टी लेयर फिल्टर मास्क लावून बाहेर पडावे असे त्यांनी सांगितले. 
 
 
 

Web Title: The effect of sexual health of Delhi's toxic air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.