शत्रूला धडा शिवण्यासाठी आमच्याकडे सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही प्रभावी मार्ग

By admin | Published: January 2, 2017 09:57 PM2017-01-02T21:57:08+5:302017-01-02T21:57:08+5:30

शत्रूला नामोहरम करण्यासाठीचा प्रभावी उपाय असलेल्या सर्जिकल स्ट्राइक करण्यात वाकबगार असलेले नवे लष्करप्रमुख बिपिन रावत

The effective way to strike a drummer is to have a more effective way than a surgical strike | शत्रूला धडा शिवण्यासाठी आमच्याकडे सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही प्रभावी मार्ग

शत्रूला धडा शिवण्यासाठी आमच्याकडे सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही प्रभावी मार्ग

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 2 -  शत्रूला नामोहरम करण्यासाठीचा प्रभावी उपाय असलेल्या सर्जिकल स्ट्राइक करण्यात वाकबगार असलेले नवे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सीमेपलीकडून सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही प्रभावी मार्ग आपल्याकडे असल्याचे सांगितले.
रावत म्हणाले,"शत्रूला घडा शिकवण्यासाठी  आमच्याकडे सर्जिकल स्ट्राइकपेक्षाही जालीम असे मार्ग आमच्याकडे आहेत. त्यांचा अवलंब करून आम्ही शत्रूंना कठोर संदेश देऊ शकतो., रावत यांच्या या वक्तव्याकडे पाकिस्तानला दिलेले आव्हान म्हणून पाहिले जात आहे. 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रावत म्हणाले, "जर आमचा शत्रू दहशतवाद्यांना पाठिंबा देत असेल तर आमची रणनीती स्पष्ट असेल, आम्ही शस्त्राचा वापर करू,  आम्ही आमच्या गजरेनुरूप त्याचा वापर करू. मला वाटतं आम्हाला सरकारने त्यासाठी मोकळीक दिलेली आहे." तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांच्याबाबत रावत यांनी सांगितले की, आम्हा दोघांनाही एकमेकांच्या क्षमतेची जाणीव आहे, त्याच मुद्यांवरच वाटचाल करत राहिलो तर दोन्ही देशात शांतता कायम राहील. 

Web Title: The effective way to strike a drummer is to have a more effective way than a surgical strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.