नशिराबाद येथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न
By admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:34+5:302016-02-02T00:15:34+5:30
नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
Next
न िराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.पत्रकाचा आशय असा- पाणीप्रश्न युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शेळगाव बॅरेज पाणी आणून शुद्धीकरणाची योजनेचे काम राजकीय द्वेषातून बंद होते; मात्र त्याबाबत पाठपुरावा करून गती देण्यास आम्हीच प्रयत्न केले असून जलशुद्धीकरणाच्या जलवाहिन्यांचे काम ७० टक्के झाले असून जॅकवेलचे काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणत आहे.वैयक्तिक स्वार्थासाठी योजनेच्या कामाची गती मंदावण्यासाठी संभाव्य अडचणी व धोका काय होईल हे जाहीर न करता व कुठलेही मार्गदर्शन न घेता जलवाहिन्यांच्या मार्गात बदल करण्याची मागणी होत असल्याचा आक्षेप रोटे यांनी घेतला आहे. परिणामी कामास विलंब होईल, मार्च अखेरपर्यंत योजनेचा निधी खर्च न झाल्यास योजनेचा निधी परत जाऊन काम रखडेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गावातील जलवाहिन्यांची गळती, दुरुसती, तोट्या बसविणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती, जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य दिले असून एमआयडीसीच्या ४ कोटी ९५ लाख ८३५ रुपयांची थकबाकीमुळे एमआयडीसीचे पाणी मिळण्यास अडचणी येत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्त्रोताच्या जवळील ५०० मीटर अंतरावरील विहिरी व इतर पाणीसाठे यांचेतील पाणी वापरावर निर्बंध आणून अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोटे यांनी पत्रकात म्हटले आहे. १ फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतीतर्फे पाणी वाचवा अभियान गाव पातळीवर राबविणार आहे. पाणी वापराबाबत जनजागृती करण्यासोबत विविध बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)