'पोकेमॉन गो' मध्ये दिसतात अंडी, न्यायालयाची सरकारला नोटीस

By admin | Published: September 7, 2016 02:34 PM2016-09-07T14:34:40+5:302016-09-07T14:57:22+5:30

पोकेमॉन गो खेळ बनवणा-या कंपनीच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

Eggs appeared in 'Pokémon go', court notice to court | 'पोकेमॉन गो' मध्ये दिसतात अंडी, न्यायालयाची सरकारला नोटीस

'पोकेमॉन गो' मध्ये दिसतात अंडी, न्यायालयाची सरकारला नोटीस

Next

ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. ७ - पोकेमॉन गो खेळ बनवणा-या कंपनीच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या खेळामध्ये प्रार्थन स्थळाच्या ठिकाणी अंडी दाखवण्यात आली आहेत त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावत असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. 
 
दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाने पोकेमॉन गो विरोधातील याचिकेवरुन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खेळाची निर्मिती करणा-या कंपनीला नोटीस बजावली आहे. 
 
आणखी वाचा 
अरे बापरे ! चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा
 
अलय अनिल दवे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अंडयाचा मांसाहारामध्ये समावेश होते. हिंदू आणि जैनांच्या प्रार्थनास्थळी अंड घेऊन जाणे ही ईश्वरनिंद ठरते असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. पोकेमॉन गो खेळताना मिळणारे पॉईंट हे अंडयाच्या स्वरुपात मिळतात आणि हे पॉईंट गेममध्ये विविध प्रार्थनस्थळांच्या ठिकाणी मिळतात असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 
 
ही एकप्रकारची ईश्वरनिंदा असल्याने संपूर्ण देशात या खेळावर बंदी घालावी अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. त्याशिवाय हा खेळ खेळणा-याच्या जीवाला धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को स्थित नियानटीक इंक कंपनीने हा खेळ बनवला आहे. 
 

Web Title: Eggs appeared in 'Pokémon go', court notice to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.