ईद ३१ मार्च की १ एप्रिल? तारीख जाहीर झाली; ईदगाहच्या मौलानांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 20:04 IST2025-03-30T20:02:59+5:302025-03-30T20:04:14+5:30
Eid ul fitr 2025 : ईद उल फित्रचा चंद्र ३० मार्च रोजी दिसला आहे. यामुळे उद्या म्हणजेच ३१ मार्चला देशभरात ईद साजरी केली जाणार आहे.

ईद ३१ मार्च की १ एप्रिल? तारीख जाहीर झाली; ईदगाहच्या मौलानांनी केली घोषणा
ईद ३१ मार्चला की १ एप्रिलला साजरी केली जाणार यावरून संभ्रम होता. तो आज दूर झाला आहे. देशभरात ईद ३१ मार्चला साजरी केली जाणार आहे. ऐशबाग ईदगाह येथे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी ही घोषणा केली आहे.
ईद उल फित्रचा चंद्र ३० मार्च रोजी दिसला आहे. यामुळे उद्या म्हणजेच ३१ मार्चला देशभरात ईद साजरी केली जाणार आहे. नमाज सकाळी १० वाजता ईदगाह लखनऊमध्ये अदा केली जाईल. नागरिकांनी रस्त्यावर नमाज अदा करू नये. सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
महिलांसाठी ईदगाह लखनऊ येथे ईदची नमाज अदा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नमाजपूर्वी मौलाना खालिद रशीद फरंगी महाली भाषण देतील. ईद उल-फित्र हा रमजान उल-मुबारकच्या एका महिन्यानंतर मुस्लिमांनी साजरा करायचा आनंदाचा धार्मिक सण आहे. इस्लामिक कॅलेंडरचा दहावा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी ईद उल-फित्र साजरी केली जाते.