छत्तीसगडमध्ये आठ नक्षलवादी ठार
By admin | Published: March 2, 2016 03:04 AM2016-03-02T03:04:17+5:302016-03-02T03:04:17+5:30
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्णात पोलिसांनी मंगळवारी पहाटे भीषण चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे.
हैदराबाद/रायपूर: छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्णात पोलिसांनी मंगळवारी पहाटे भीषण चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे.
सुकमा जिल्ह्णाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्णाच्या किस्ताराम पोलीस स्टेशनअंतर्गत सकलेर गावातील जंगलात तेलंगणाच्या ग्रेहाँड पोलीस दलाने ही कारवाई केली. तेलंगण सीमेलगतच्या या क्षेत्रात नक्षल्यांच्या हालचालींची गोपनीय सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथक शोध मोहिमेवर निघाले होते. हे पथक सकलेर गावातील जंगलात पोहोचताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही कारवाई केली. काही काळ चकमकीनंतर नक्षली तेथून पसार झाले. घटनास्थळी पोलिसांना आठ नक्षल्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या जवळून एक
एके ४७ रायफल, एक एसएलआर रायफल, तीन इन्सास रायफल आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे.
या चकमकीत उत्तर तेलंगणाचे नक्षली ठार झाले असून त्यात
क्षेत्रीय समितीचा सदस्य हरिभूषणचाही समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली
आहे. (वृत्तसंस्था)