तेलंगणामध्ये आठ नक्षली ठार; नव्यानेच स्थापन संघटनेचा नि:पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:01 AM2017-12-15T00:01:13+5:302017-12-15T00:01:26+5:30

तेलंगणात गुरुवारी सकाळी बेथापुडी गावानजीक चकमकीत ‘सी पी बाटा’ या सशस्त्र नक्षलवादी संघटनेचा विभागीय समिती सचिव व कमांडरसह ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करून तेलंगणाच्या विशेष पोलीस दलाने या संघटनेला हात-पाय पसरण्याआधीच जबर तडाखा दिला.

Eight Naxalites killed in Telangana; The newly established organization isolated | तेलंगणामध्ये आठ नक्षली ठार; नव्यानेच स्थापन संघटनेचा नि:पात

तेलंगणामध्ये आठ नक्षली ठार; नव्यानेच स्थापन संघटनेचा नि:पात

Next

हैदराबाद : तेलंगणात गुरुवारी सकाळी बेथापुडी गावानजीक चकमकीत ‘सी पी बाटा’ या सशस्त्र नक्षलवादी संघटनेचा विभागीय समिती सचिव व कमांडरसह ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करून तेलंगणाच्या विशेष पोलीस दलाने या संघटनेला हात-पाय पसरण्याआधीच जबर तडाखा दिला.
कोळसा खाण परिसरातील कोठागुडेमजवळच्याच जंगलात पोलीस व नक्षलींमध्ये तुंबळ चकमक उडाली. नक्षलींचा खात्मा केल्यानंतर पोलिसांनी शस्त्रे व स्फोटकांसह सामान-सुमान असलेली आठ गठोडी जप्त केली आहेत. एक एसएलआर, दोन ८ मिमीच्या बंदुका आणि दोन एसबीबीएल बंदुकांचा जप्त करण्यात आलेल्या साहित्यात समावेश आहे.
सी पी बाटा या संघटनेची मूळ तात्त्विक बांधिकली चंद्र पुल्ला रेड्डी गटाशी आहे. पीपल्स वॉर ग्रुपच्या तुलनेत प्रभावी असलेल्या चंद्र पुल्ला रेड्डी या गटाची स्थापना सीपीआय-एमएल जनशक्तीच्या सदस्यांनी केली होती.
वीटभट्टी, फरशी उद्योग, दारू दुकानदार, इमारती लाकडाचे व्यापारी, सरकारी ठेकेदार आणि बाजार समितीतील दलालांंना धमकावून खंडणी वसुली करण्यात ही संघटना सक्रिय आहे. बेथापुडीगतच्या जंगलात या संघटनेने काही तरुणांना पाचारण केल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांच्या दलाच्या नक्षलवादीविरोधी पथकाने त्यांना पकडण्यासाठी बुधवारी रात्रीच बेथापुडी गावाकडे कूच केले. कोणालाही पळ काढता येऊ नये, याची खबरदारी घेत पोलिसांनी या भागाला चोहोबाजूने वेढा घातला.

नऊ फुटीर गट सक्रिय
कोठगुडेम भागात नक्षलवाद्यांचे वेगवेगळे नऊ फुटीर गट सक्रिय होते. हे नक्षलवादी आधी जनशक्ती संघटनेचे सदस्य होते. सीपीआय-एमएल चंद्र पुल्ला रेड्डी (सीपी) बाटा या नावाची नवीन संघटना २४ जुलै रोजी स्थापन करण्यात आली होती.

Web Title: Eight Naxalites killed in Telangana; The newly established organization isolated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.