हैदराबादमधील औषध फॅक्टरीत भीषण स्फोट; आगीत 8 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:02 PM2020-12-12T17:02:58+5:302020-12-12T17:06:35+5:30
Massive Fire at Vindhya Organics Pvt Ltd Hyderabad : आणखी काही कर्मचारी फॅक्टरीत अडकले असण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील एका औषध फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीत 8 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आणखी काही कर्मचारी फॅक्टरीत अडकले असण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील हैदराबादच्या बाहेर असलेल्या औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या परिसरातील बोल्लम येथील एका औषध फॅक्टरीत शनिवारी (12 ऑगस्ट) भीषण स्फोट झाला. यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विंध्य ऑर्गेनिक्स असं या औषध फॅक्ट्रीचं नाव आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.
Telangana: Eight people injured in a massive fire that broke out at Vindhya Organics Pvt Ltd in Industrial Development Area, Bollaram of Hyderabad.
— ANI (@ANI) December 12, 2020
Police say, "A solvent was kept for some reaction after which it caught fire. Injured shifted to hospital. Rescue operation is on" pic.twitter.com/7XTb7CahiU