काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:18 AM2019-09-03T05:18:12+5:302019-09-03T05:18:18+5:30

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले

Eight terrorists killed in Kashmir in eight months | काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

Next

श्रीनगर : यंदाच्या वर्षी १ जानेवारीपासून ते २९ आॅगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने १३९ दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत २६ जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, आॅगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २७ दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात २२ दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

शस्त्रसंधीचे उल्लंघन
५ आॅगस्टनंतर ते २९ आॅगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने २२२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने २९६ वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १८९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत १८८९ वेळा घडले होते.

जम्मू- काश्मिरातील काही नेत्यांना अटक करण्यात आलेली असून, या नेत्यांना ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर’येथे ठेवण्यात आलेले आहे.

पाकशी वाटाघाटी नाही : एस. जयशंकर
लंडन : पाकिस्तान उघडपणे दहशतवादाला खतपाणी घालत आहे. जोपर्यंत इस्लामाबादमधून अतिरेकी गटांना आर्थिक रसद पुरविली जाते, या गटांमध्ये माथेफिरुंचा भरणा केला जात आहे, तो पर्यंत पाकिस्तानशी वाटाघाटी करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये लिहिलेल्या लेखाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जयशंकर बोलत होते. अण्वस्त्राची छाया दक्षिण आशियावर दाटलेली असताना तातडीने चर्चा केली पाहिजे, अशी अपेक्षा खान यांनी व्यक्त केली होती.
जयशंकर यांनी ‘पॉलिटिको’ या प्रसार माध्यमाला ब्रुसेल्समध्ये मुलाखत दिली. ते म्हणाले की, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद पसरवित असताना चर्चेची कल्पना करणे योग्य नाही. काश्मीरमध्ये परिस्थिती कशी आहे, असे विचारले असता येत्या दिवसांमध्ये खोºयातील सुरक्षा दलांचे नियंत्रण कमी केले जाईल, असे नमूद केले. ते म्हणाले की, अतिरेकी शक्तींची सक्रीयता थांबविण्यासाठी, हिंसा घडविण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात असलेल्या लोकांमधील संवाद थांबविण्यासाठी इंटरनेट, टेलिफोन सेवा यांच्यात कपात करणे आवश्यक होते. 

Web Title: Eight terrorists killed in Kashmir in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.