पश्चिम विभागात आठ स्वागत यात्रा
By Admin | Published: March 25, 2016 10:44 PM2016-03-25T22:44:26+5:302016-03-25T23:47:23+5:30
नाशिक : ८ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विभागातून आठ स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. गंगापूर रोड येथे गीतांजली सोसायटीच्या सभागृहात आयोजित नववर्ष स्वागत यात्रांच्या पूर्वतयारीच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

त्र्यंबक रोड परिसरातून तीन, गंगापूररोड परिसरातून तीन, योग विद्याथाम कॉलेजरोड तसेच निर्मल विहार काळेनगर येथून प्रत्येकी एक याप्रमाणे स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. पाडव्याच्या दिवशी सकाळी सहा वाजता मिरवणुका काढण्यात येणार असून, यंदा महिलांची बाईक रॅली, सायकल रॅली, तालरुद्र ढोल पथक, वासुदेव पारंपरिक पोषाख, लहान मुलांच्या वेशभूषा अशा प्रकारच्या सहभागातून स्वागत यात्रेला रंगत आणली जाणार आहे. बैठकीस प्रकाश दीक्षित, रवि बेडेकर, मोरे, बापू कोतवाल, योगेश बक्षी, देवदत्त जोशी, विवेक पवारा, नरंेद्र सोनवणे, किशोर विग, अजित कुलकर्णी, महेश हिरे, वर्षा डोंगरीकर, रोहिणी नायडू, योगीता शेटे, स्वाती भामरे, सुचेता काकडे आदि उपस्थित होते. आता दर बुधवारी सायंकाळी सात वाजता गीतांजली सभागृहात पूर्वतयारी बैठका होणार आहे.