आठ न्यायाधीश महिनाभरात निवृत्त

By admin | Published: September 20, 2015 10:56 PM2015-09-20T22:56:18+5:302015-09-20T22:56:18+5:30

महिनाभरात राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ, पाटणा अशा विविध उच्च न्यायालयांतील आठ न्यायाधीश सेवानिवृत्त झाले असून, यामुळे उच्च न्यायालयांती रिक्त पदांची संख्या ३९२ वर पोहोचली आहे

Eighteen judges retire in a month | आठ न्यायाधीश महिनाभरात निवृत्त

आठ न्यायाधीश महिनाभरात निवृत्त

Next

नवी दिल्ली : महिनाभरात राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ, पाटणा अशा विविध उच्च न्यायालयांतील आठ न्यायाधीश सेवानिवृत्त झाले असून, यामुळे उच्च न्यायालयांती रिक्त पदांची संख्या ३९२ वर पोहोचली आहे. गत आॅगस्टमध्ये हा आकडा ३८४ होता. विशेष म्हणजे तूर्तास उच्च न्यायपालिकेत न्यायाधीशांची नवनियुक्ती वा बढतीची कुठलीही व्यवस्था नसताना या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.
सर्वोच्च व उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आतापर्यंत वापरली जाणारी कॉलेजियम पद्धत रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक आयोगामार्फत नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावर्षी १३ एप्रिलला याबाबतचा कायदा लागू झाला होता.
कायदा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात २९२ पदे रिक्त आहेत. १ आॅगस्टपर्यंत हा आकडा ३८४ होता, १ मेपर्यंत ३६६ होता.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Eighteen judges retire in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.