आठवलेंची कविता अन् चिमटेही
By admin | Published: December 2, 2015 03:56 AM2015-12-02T03:56:12+5:302015-12-02T03:56:12+5:30
राज्यसभेत रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी कधी कविता म्हणत तर कधी विरोधकांना चिमटे काढत सभागृहात हास्याची कारंजी उडविली. माझा जोपर्यंत मोदींना पाठिंबा आहे
नवी दिल्ली : राज्यसभेत रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी कधी कविता म्हणत तर कधी विरोधकांना चिमटे काढत सभागृहात हास्याची कारंजी उडविली. माझा जोपर्यंत मोदींना पाठिंबा आहे, तोपर्यंत त्यांच्या सरकारला धोका नाही, या त्यांच्या विधानावर सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
बिहारमधील रालोआच्या पराभवावरही त्यांनी काव्यमय भाष्य केले. ‘यूपीए सरकारने महंगे किए थे सब्जी और आलू, फिर कैसे आए बिहारमे नितीश और लालू’ या त्यांच्या कवितेवरही धमाल उडाली; मात्र जेडीयूच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘‘मैं नरेंद्र मोदी का करता हूं अभिनंदन, क्योंकि उन्होंने जाकर लंडन, बाबासाहेब का किया है वंदन ’’ या त्यांच्या ओळीवर सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून दाद दिली.