कला अकादमीत रविवारी ‘एकांकिका महोत्सव’

By Admin | Published: February 3, 2016 12:28 AM2016-02-03T00:28:53+5:302016-02-03T00:28:53+5:30

पणजी : कला अकादमी गोवा व उत्कर्ष सेवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 रोजी मुंबई येथील निमंत्रित 8 संस्थांचा समावेश असलेला ‘एकांकिका महोत्सव’ कला अकादमीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9.45 वाजता कला अकादमीचे अध्यक्ष व उपसभापती विष्णू वाघ यांच्या हस्ते होईल.

'Ekanika Mahotsav' in Kala Academy Sunday | कला अकादमीत रविवारी ‘एकांकिका महोत्सव’

कला अकादमीत रविवारी ‘एकांकिका महोत्सव’

googlenewsNext
जी : कला अकादमी गोवा व उत्कर्ष सेवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 रोजी मुंबई येथील निमंत्रित 8 संस्थांचा समावेश असलेला ‘एकांकिका महोत्सव’ कला अकादमीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9.45 वाजता कला अकादमीचे अध्यक्ष व उपसभापती विष्णू वाघ यांच्या हस्ते होईल.
या वेळी कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष श्यामराव चौगुले व उत्कर्ष सेवा मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच अकादमीचे सदस्य सचिव नीळकंठ शिंगणापुरकर हे उपस्थित असतील.
उत्कर्ष सेवा मंडळाने ‘उंबरठा 2015’ या शीर्षकाअंतर्गत मुंबई येथे एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील 8 विजेत्या एकांकिका गोव्यातील महोत्सवात सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या आहेत. साधारण 250 कलाकार, तंत्रज्ञ यांचा चमू गोव्यातील महोत्सवासाठी येणार आहे. तांत्रिकदृष्ट्या नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, अभिनय, कुशल दिग्दर्शन व प्रभावी एकांकिका पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना तसेच गोमंतकीयांना मिळणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर सकाळी 10 वा. एकांकिका सादरीकरणास प्रारंभ होईल. यात राकेश जाधव लिखित व दिग्दर्शित व जिराफ थिएटर प्रस्तुत ‘जून-जुलै’, अनिकेत पाटील लिखित व दिग्दर्शित व झिरो बजेट प्रॉडक्शन प्रस्तुत ‘दृष्टी’, मोहन बनसोडे लिखित व ओमकार जयंत दिग्दर्शित फोर्थ वॉल ठाणे प्रस्तुत ‘मित्तर’, स्वरदा बुरसे लिखित व अभिजीत झुंजाररावद्वारा दिग्दर्शित ‘अभिनव’, कल्याण या संस्थेची प्रस्तुती ‘सेल्फी’, राजेश शिरे लिखित व रामचंद्र गावकर दिग्दर्शित विनायक गणेश वझे केळकर कॉलेज मुलुंड प्रस्तुत ‘द क्रो मॅन’, हृषिकेश कोळी लिखित अमोल मोरे व साईनाथ गणुवाड दिग्दर्शित नाट्यमय, ठाणे या संस्थेची प्रस्तुती ‘मुस्काट’, ओमकार राऊत लिखित, स्वप्नील हिंगडे व ओमकार राऊत दिग्दर्शित महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ या संस्थेची प्रस्तुती ‘बत्ताशी’, व विष्णू सूर्या वाघ लिखित व गिरीश पांडे दिग्दर्शित रंगरेखा मुंबई या संस्थेची प्रस्तुती ‘रक्तपर्जन्य’ या एकांकिकांचा समावेश आहे.
एकांकिका महोत्सव सर्वांसाठी खुला असून सर्वांनी या महोत्सवास उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ekanika Mahotsav' in Kala Academy Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.