लाच प्रकरणी आपण सीबीआय चौकशीला तयार एकनाथ खडसे : छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Published: May 16, 2016 12:44 AM2016-05-16T00:44:29+5:302016-05-16T00:44:29+5:30

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तयारी आहे. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Eknath Khadse ready for CBI inquiry into graft: | लाच प्रकरणी आपण सीबीआय चौकशीला तयार एकनाथ खडसे : छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

लाच प्रकरणी आपण सीबीआय चौकशीला तयार एकनाथ खडसे : छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Next
गाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तयारी आहे. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खडसे म्हणाले, तक्रारदार डॉ.रमेश जाधव यांनी २००८ व २००९ मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी तत्कालिन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यांनी सवार्ेच्च न्यायालयाचा दाखला देत जमीन देण्यास नकार दिला. तसेच २०१४ मध्ये ही जमीन परिवहन खात्याला देण्याबाबत आदेश दिले. त्या आशयाचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देत ती जागा परिवहन खात्याकडे वर्ग केली.
दरम्यानच्या काळात डॉ.जाधव यांनी आपल्याकडेसुद्धा पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूल मंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायरानाची आहे. जमीन परिवहन खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने ही जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण २५ फेब्रुवारी रोजी दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप केला.
तक्रारदार हा विकृत
या प्रकरणात तक्रारदाराने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचेची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी। असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता ती व्यक्ती विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसे म्हणाले.
एक कोटीवर किती शून्य हे गजाननला माहित नाही
गजानन उर्फ गजमल पाटील हा मतदार संघातील व्यक्ती आहे. वारकरी असल्यामुळे आपल्यासोबत तो आषाढीच्या वारीमध्ये अनेकदा आला आहे. त्याची ओळख नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. गजानन याला एक कोटीवर किती शून्य आहे हे विचारल्यास सांगता येणार नाही असेही ते म्हणाले.

हेलिकॉप्टर सौद्याची चौकशीची मागणी केली असती तर आनंद

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी अशीच अगुस्ता वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर सौद्यांची किंवा अशोक चव्हाण यांनी केलेल्या आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली असती तर आपल्याला आनंद झाला असता असे खडसे म्हणाले.

Web Title: Eknath Khadse ready for CBI inquiry into graft:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.