Eknath Shinde: एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 06:11 PM2022-07-17T18:11:03+5:302022-07-17T18:12:17+5:30

Eknath Shinde: बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला विशेष विमान (Air Ambulace) ने आणले पुण्यात.

Eknath Shinde: Airlift Bihar to Pune... Eknath Shinde direct call to Jyotiraditya Scindia for Marathmola family of bihar which injured in accident | Eknath Shinde: एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन

Eknath Shinde: एअरलिफ्ट 'बिहार ते पुणे'... मराठमोळ्या कुटुंबासाठी CM शिंदेंचा थेट ज्योतिर्रादित्य शिंदेंना फोन

Next

सातारा/मुंबई - बिहारमधील पाटणा येथे, महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता.खटाव जि.सातारा येथील, अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्या प्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे धावून आले अन् या मराठामोळ्या कुटुंबाच्या दु:खाचं ओझं हलकं झालं. 

दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला Air Ambulance कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी दिवसभर अश्रू ढाळत होते. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता. त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सुत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ, शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही.

वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २, Air Ambulance बुक केल्या. आणि त्या कुटुंबाला, दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यास दिले. आणि विमान दिवस उजेडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले. जखमीपैकी ११ वर्षाच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान (Air ambulance) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमीपैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान (Air Ambulabce) सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत.

वेळेवर मदत मिळाल्याने रुग्णाचे नातेवाईक विमानतळावर अश्रू ढाळत होते. आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो, हे आज आम्हाला समजल्याची भावना व्यक्त करत होते. नाव, गाव, पत्ता, ना ओळख, ना कोणाची शिफारस, काहीही माहिती नसताना साहेबांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी आम्ही खूप लोकांना बोललो पण मदत होऊ शकली नाही. परंतु एकनाथ शिंदे आमच्या मदतीला धावून आले. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिल्याची भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत होते. तसेच मुलं बरी झाल्यानंतर त्यांना घेऊन शिंदे साहेबांना भेटण्यास घेऊन जाणार असल्याचे रुग्णाच्या आईने सांगितले. आमच्या मूळ गावी हे समजल्याने सर्व गावकऱ्यांनी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले. तसेच बिहार येथेही शिंदे साहेबांबद्दल तेथील स्थानिक व मराठी लोकांनी "शिंदे साब को मान गये" अशी भावना व्यक्त केल्याचेही सांगितले. ही सर्व हकीकत सांगताना, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगावर काटे व डोळ्यात पाणी येत होते. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तो पर्यंत शिंदे साहेबांच्या मदतीची परतफेड करू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Eknath Shinde: Airlift Bihar to Pune... Eknath Shinde direct call to Jyotiraditya Scindia for Marathmola family of bihar which injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.