एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? आज पुन्हा सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:20 AM2023-01-17T11:20:36+5:302023-01-17T11:21:12+5:30

मंगळवारी ठाकरे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत.

Eknath Shinde or Uddhav Thackeray, who exactly is Shiv Sena? Hearing again today | एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? आज पुन्हा सुनावणी

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? आज पुन्हा सुनावणी

googlenewsNext

नवी दिल्ली : शिवसेना पक्षावर कोणत्या गटाचा अधिकार राहील, या मुद्यावर सुरू असलेली सुनावणी मंगळवारी पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेना राजकीय पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा हक्क राहील, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात शिंदे गटातर्फे खासदार महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. मंगळवारी ठाकरे गटातर्फे बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची पाच वर्षांची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. यामुळे या सुनावणीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. २३ जानेवारीपूर्वी शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोग  निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Web Title: Eknath Shinde or Uddhav Thackeray, who exactly is Shiv Sena? Hearing again today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.