Eknath Shinde : हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 05:37 PM2022-06-27T17:37:34+5:302022-06-27T17:44:51+5:30

Eknath Shinde : ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde Tweet Over supreme court and Shivsena MLA | Eknath Shinde : हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे

Eknath Shinde : हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय - एकनाथ शिंदे

Next

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह मविआच्या ५० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली. याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावली. आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. 

११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलै ५.३० पर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय" असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!" असं म्हटलं आहे. तसेच  realshivsenawins हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

मागच्या आठवड्याभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये बैठकींना देखील वेग आला आहे. तसेच महाविकास आघाडीविरोधात भाजपाच्या अंतर्गत बैठकींबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजपाने आता मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.

Read in English

Web Title: Eknath Shinde Tweet Over supreme court and Shivsena MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.