Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पक्षाचा अध्यक्ष असायला हवे का? सरन्यायाधीशांचे वक्तव्य शिवसेनेची चिंता वाढविणारे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:26 PM2022-07-20T12:26:32+5:302022-07-20T12:33:46+5:30
शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीशांनी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यावर विचारविनिमय केला. यानंतर मोठ्या खंडपीठाकडे सोपवत नसल्याचे म्हटले.
एकनाथ शिंदे यांच्यासह १४ बंडखोर आमदारांच्या आपात्रतेवरून आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्याच अध्यक्षतेखालील खंडपीठात सुनावणी सुरु होती. यावर शिवसेना, शिंदे आणि राज्यपालांच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर सरन्यायाधीश रमणा यांनी दोन्ही बाजुंना येत्या आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
पक्षाची एकत्र बैठक होणे गरजेचे होते. तुमचा आक्षेप गटनेता निवडीला आहे का असा सवाल सरन्यायाधीश रमणा यांनी उद्धव ठाकरेंच्या वकिलांना केला. तसेच सदस्यांना नेता निवडीचा अधिकार असतो तर गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.
याचबरोबर मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीशांनी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यावर विचारविनिमय केला. यानंतर मोठ्या खंडपीठाकडे सोपवत नसल्याचे म्हटले.
२७ जुलैला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगतानाच पुढील सुनावणी १ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. तसेच गरज पडली तर मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.