शेतकरी केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण एकनाथराव खडसे : दुध उत्पादक संस्थांची कार्यशाळा

By admin | Published: March 28, 2016 01:14 AM2016-03-28T01:14:06+5:302016-03-28T01:14:06+5:30

जळगाव - सामान्य शेतकर्‍याला दुग्धव्यवसाय हा उत्तम जोडधंदा ठरुन पयार्यी उत्पन्नाचा स्त्रोत होण्यासाठी दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण करतांना सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे अद्यावत ज्ञान शेतकर्‍यांपयंर्त पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्‘ाचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी येथे केले.

Eknathrao Khadse: Workshop of dairy farmers | शेतकरी केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण एकनाथराव खडसे : दुध उत्पादक संस्थांची कार्यशाळा

शेतकरी केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण एकनाथराव खडसे : दुध उत्पादक संस्थांची कार्यशाळा

Next
गाव - सामान्य शेतकर्‍याला दुग्धव्यवसाय हा उत्तम जोडधंदा ठरुन पयार्यी उत्पन्नाचा स्त्रोत होण्यासाठी दुग्धव्यवसायाचे मजबुतीकरण करतांना सामान्य शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून दुग्धव्यवसायाचे अद्यावत ज्ञान शेतकर्‍यांपयंर्त पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्‘ाचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी येथे केले.
भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन, आणंद व जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्‘ातील सहकारी दुध संस्थांचे चेअरमन व सचिव यांची एक दिवसीय कार्यशाळा रविवारी जळगाव येथील महेश प्रगती सभागृहात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते उपस्थित दुध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित करीत होते. अध्यक्षस्थानी भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन, आणंदचे अध्यक्ष सुभाषचंद्र मांडगे हे होते. यावेळी खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार सुरेश भोळे, महानंद व जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित जळगावच्या चेअरमन मंदाताई खडसे, महानंदचे संचालक विनायक पाटील, सहकार भारतीचे संजय बिर्ला, डॉ.सुपेकर, दुध उत्पादक संघ मर्यादित जळगावचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
दुध उत्पादनात वाढ मात्र दर्जा सुधारण्याची गरज
आपल्या भाषणात खडसे म्हणाले की, देशभरात दुधाचे उत्पादनात वाढ झाल्याचे दिसत असले तरी दर्जा आणि प्रति जनावर दुधाच्या प्रमाणात आपण अन्य देशांच्या तुलनेने मागे आहोत. जगातील अन्य देशांनी या संदर्भात संशोधन आणि प्रगती केली आहे. आपल्याला ही प्रगती साध्य करण्यासाठी नवीन तंत्र आत्मसात केले पाहिजे. हे तंत्रज्ञान सामान्य दुध उत्पादकापयंर्त पोहोचवून त्यांना सक्षम करण्याची शासनाची भूमिका आहे. त्याचा उद्देश देशातील दुग्धोत्पादनाच्या प्रमाणात व दर्जात वाढ करण्यासोबत सामान्य शेतकर्‍याला चांगला जोडधंदा उपलब्ध करुन देण्याचा आहे. देशात दुधाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याची आवश्यकता आहे. दुधावर प्रक्रिया करण्याबाबतही आधुनिक तंत्रज्ञानाचा बदल स्विकारण्यासाठी जिल्हा दुध संघ उत्सूक आहे.

Web Title: Eknathrao Khadse: Workshop of dairy farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.