सुदृढ लोकशाहीचे गमक राज्यघटनेत एकनाथराव खडसे : सामाजिक न्याय विभागातर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळा
By admin | Published: March 5, 2016 11:49 PM2016-03-05T23:49:22+5:302016-03-05T23:49:22+5:30
जळगाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घटनेत आहे, असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
Next
ज गाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घटनेत आहे, असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त शनिवारी पत्रकारांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आयोजित या कार्यशाळेसाठी एकनाथराव खडसे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, उपजिल्हाधिकारी साजिदखान पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार, सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त राकेश पाटील,जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दीपप्रज्ज्वालन करण्यात आले.बुद्धिमत्ता, परिश्रम, कतृर्त्वाच्या जोरावर क्रांती...उपस्थित पत्रकारांना आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतांना खडसे म्हणाले की, आपली बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि कतृर्त्वाच्या जोरावर डॉ. आंबेडकर यांनी या देशात सामाजिक क्रांती घडवली. समाजातील दलित, मागासलेल्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तत्कालिन व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले आणि न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या देशाला एका सूत्रात बांधणारी राज्यघटना दिली. जगभरातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना...आजही भारताची राज्यघटना जगभरातील सर्वोत्कृष्ट घटना मानली जाते. प्रत्येक नागरिकाच्या मताला समान अधिकार या घटनेने दिला आहे. या अधिकाराद्वारे लोक येथे आपले राज्यकर्ते कोण, हे ठरवू शकतात. राज्याच्या प्रत्येक निर्णयात जनतेचा सहभाग असतो, ही सगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची किमया आहे, असे खडसे म्हणाले. शासनाचे अनेक उपक्रम... देशाला अहिंसा आणि शांतीचा विचार देण्यासाठी त्यांनी बुद्ध धर्माचा अंगीकार केला. विघटनवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे हे वैश्विक स्वरुप लोकांपुढे आणण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असेही खडसे यांनी सांगितले.