"मी अजून जिवंत आहे"; वृद्ध महिलेला कर्मचार्‍यांनी कागदावर मृत दाखवून पेन्शन केली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 04:06 PM2023-09-13T16:06:20+5:302023-09-13T16:13:05+5:30

जेव्हा महिलेने पीपलू पेन्शन ऑफिस गाठलं आणि तिची पेन्शन बंद झाल्याची माहिती विचारली तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तिला धक्काच बसला.

elderly woman wants to get certificate of survival requested collector to start her pension | "मी अजून जिवंत आहे"; वृद्ध महिलेला कर्मचार्‍यांनी कागदावर मृत दाखवून पेन्शन केली बंद

फोटो - hindi.news18

googlenewsNext

सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे एका जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित केल्याची घटना राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात समोर आली आहे. पीपलूच्या बनवाडा ग्रामपंचायतीत राहणाऱ्या स्याणी देवी यांनी हयातीचा दाखला देऊन विधवा पेन्शन सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी चिन्मयी गोपाल यांच्याकडे केली आहे. स्याणी देवी यांना 2013 पासून विधवा पेन्शन मिळत होती, मात्र गेल्या 8-9 महिन्यांपासून पेन्शन बंद आहे.

जेव्हा महिलेने पीपलू पेन्शन ऑफिस गाठलं आणि तिची पेन्शन बंद झाल्याची माहिती विचारली तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तिला धक्काच बसला. कार्यालयात उपस्थित असलेल्या लोकांनी वृद्ध महिलेला सरकारी कागदपत्रांनुसार मृत घोषित करून पेन्शन बंद केल्याची माहिती दिली. महिलेने सरकारी कर्मचाऱ्यांसमोर हजर असल्याचे सांगितल्यावर त्यांना त्यांच्या असण्याचं प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आलं. हयातीचा दाखला मिळवण्यासाठी आता वृद्ध महिला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोणतीही सुनावणी होत नाही.

स्याणी देवी यांनी सांगितले की, हयातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा मारून त्या कंटाळल्या आहेत. पेन्शन कार्यालयात प्रमाणपत्र जमा करून विधवा पेन्शन सुरू करायचं आहे. मात्र सरकारी कर्मचारी तिचे प्रमाणपत्र बनवत नाहीत. त्यामुळे हयातीचा दाखला लवकरात लवकर व्हावा व विधवा पेन्शन सुरू व्हावे यासाठी त्या सर्व कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकारी चिन्मयी गोपाळ यांच्याकडे आल्या. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही महिलेने केली आहे.

चुरू जिल्ह्यातील सादुलपूरजवळील बेरासर छोटा गावात एका महिलेला सरकारी रेकॉर्डमध्ये मृत घोषित करून तिचे विधवा पेन्शन बंद केल्याची घटना समोर आली आहे. बेरासर येथील तीजा देवी यांचे पती फूलराम यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. 2003 पासून पेन्शन मिळत होती पण जानेवारी 2023 मध्ये पेन्शन बंद झाली. महिलेला पेन्शन पीपीओ ऑनलाइन मिळाल्यावर पंचायत समितीने मृत घोषित केल्यानंतर पेन्शन बंद केल्याचं समजलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: elderly woman wants to get certificate of survival requested collector to start her pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.