पत्नी-मुलाचा कारनामा! 'मी जिवंत आहे...' म्हणत 'तो' पुरावा घेऊन एसपी ऑफिसमध्ये पोहचला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 13:23 IST2023-03-21T13:15:45+5:302023-03-21T13:23:11+5:30
एका व्यक्तीने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं.

फोटो - news18 hindi
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी थेट एसपी ऑफिस गाठलं. या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाने त्याला मृत घोषित करून त्याचं खोटं मृत्यूपत्र बनवलं आणि सर्व संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, चंकसेरिया येथील रहिवासी असलेल्य़ा सुरेंद्र यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला आहे. त्यांच्या पत्नीने सर्व जमीन मुलाच्या आणि स्वत:च्या नावावर करून घेतली आहे.
जिवंत असलेल्या पतीला मृत घोषित करून संपत्ती हडपणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जेव्हा नवऱ्याला हा सर्व धक्कादायक प्रकार समजला तेव्हा त्याने न्यायासाठी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आता तो न्याय मागत असून जिवंत असल्याचं सर्वांना सांगत आहे. सुरेंद्रने एसपी कार्यालयात पोहचून अधिकाऱ्यासमोर हजर होत आपण जिवंत असल्याचा पुरावा दिला.
अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच पोलिसांना आता सुरेंद्र यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची देखील व्यवस्था केली आहे. सुरेंद्र यांनी पत्नीचं गावातील एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यानेच आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचं देखील म्हटलं आहे. पत्नी मारहाण देखील करायची. जेवायला द्यायची नाही असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"