UP Election 2017 : राजकारण्यांची बेताल वक्तव्यं
By Admin | Published: February 28, 2017 01:56 PM2017-02-28T13:56:35+5:302017-02-28T15:19:49+5:30
विरोधी पक्षातील नेत्यावर कुरघोडी आणि टीका करताना नेत्यांनी अनेक वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केली आहेत. त्यापैकी काही वक्तव्यं खालीलप्रमाणे आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - उत्तरप्रदेश पाचव्या टप्यातीन मतदानानंतर राजकीय आरोप-प्रत्योप थंडावले आहेत. प्रचारावेळी भाजपा, काँग्रेस-सपा आणि बसपा यांनी जोरदार प्रचार केला. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणला लावली आहे. अखिलेश यादवने आपली सत्ता वाचवण्यासाठी काँग्रसेबरोबर युती केली आहे. तर मायावती आपल्या बसपाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लढत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला रोज नविन वळण मिळतं आहे. समोरच्या पक्षातील नेत्यावर कुरघोडी आणि टीका करताना नेत्यांनी अनेक वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यं केली आहेत. त्यापैकी काही वक्तव्यं खालीलप्रमाणे आहेत.
कसाब वरुन वादंग -
- उत्तर प्रदेशचा विकास हा या कसाबमुळेच थांबला आहे. या कसाबला उत्तर प्रदेशमधून बाहेर हाकलून द्या, असं म्हणत कसाब या शब्दाची फोडणी करताना अमित शाह म्हणाले होते, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पार्टी आणि ब म्हणजे बहुजन समाज पार्टी आहे.
अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतान बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका करताना अमित शहाच उत्तरप्रदेशचे खरे कसाब आहेत.
- जे विकास कार्य उत्तर प्रदेशाचा मुलगा (अखिलेश यादव) करुन शकला नाही, ते काम त्यांचा दत्तक पुत्र (पंतप्रधान नरेंद्र मोदी) करेल - मोदी
- प्रत्येक मृत व्यक्तीला अग्नी द्यावा - साक्षी महाराज
वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्त चर्चेत असणारे साक्षी महाराज यांनी आज कोणत्याही मृत व्यक्तीला दफन करण्याची गरज नाही भारतातीस प्रत्येक मृत व्यक्तीला अग्नी द्यावा असे वादग्रस्त विधान करत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतात प्रत्येक मृत व्यक्तीला हिंदू रितरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात यावे असे साक्षी महाराज म्हणाले.
गाढवावरुन वादंग - आरोपप्रत्यारोपाच्या फैरीमध्ये उत्तरप्रेदशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अमिताभ बच्चन यांना यामध्ये ओढले. महानायक अमिताभ बच्चन यांना विनंती करतो की, त्यांनी गुजरातमधल्या गाढवांची जाहीरात करणे बंद करावे. गुजरातच्या गाढवांची प्रसिद्धी करु नका असे अखिलेश म्हणाले. अमिताभ बच्चन गुजरात पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बिसेडर असल्याने ते तेथील पर्यटन स्थळांची जाहीरात करतात.
- गाढवापासूनच प्रेरणा घेतो हे मी गर्वाने सांगतो. मी देशासाठी गाढवाप्रमाणे काम करत असून देशातील १२५ कोटी जनता माझे मालक आहेत. गाढव हा प्रामाणिक असतो. गाढव दिलेले काम नेहमी पूर्ण करतो असे मोदींनी म्हटले होते.
कब्रस्तानवरुन चिखलफेक -
- एखाद्या गावात कब्रस्तान तयार केले जाणार असेल, तर तेथे स्मशानभूमीही तयार केली पाहिजे. जर रमजानमध्ये वीज मिळत असेल, तर दिवाळीतही ती मिळायला हवी. जर होळीला वीज मिळत असेल, तर ती ईदच्या दिवशीही मिळाली पाहिजे. भेदभाव व्हायला नको - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या विधानांचा समाचार घेताना अखिलेश म्हणाले की, ते (मोदी) कब्रस्तान आणि स्मशानाची भाषा करीत आहेत. आम्ही मात्र लॅपटॉप आणि स्मार्टफोन जनतेला देण्याचे बोलत आहोत.
- मोदींना जेव्हा भीती वाटते त्यावेळी ते दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, विष पसरवायला सुरूवात करतात. मात्र, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आता त्यांना फायदा होणार नाही. - राहुल गांधी
- पंतप्रधान मोदींनी 104 उपग्रह सोडण्याचे काम केले, राहुल गांधी पंक्चर झालेल्या सायकलला धक्का देण्याचे काम करत आहेत. - अमित शहा यांची सपा-काँग्रसेच्या युतीवर टीका
उत्तरप्रदेशच्या विकासाचा वनवास लवकरच संपेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- भाजपा सरकार स्ततेत आल्यानंतर उत्तरप्रदेशमधिल सर्व कत्तल खाने बंद करण्यात येतील - अमित शहा
बीएसपी म्हणजे बहनजी संपत्ती पार्टी - मोदी
मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) मोदी यांनी बहनजी संपत्ती पार्टी असे वर्णन केले. मायावती यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाचा संदर्भ त्यांच्या या विधानाला होता.
मोदी हे निगेटिव्ह दलित मॅन - मायावती
माजी मुख्यमंत्री असलेल्या मायावती यांनी मोदी यांच्या नावाच्या आद्याक्षरांवर कोटी करत या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. (नरेंद्र दामोदरदास) मोदी हे मिस्टर निगेटिव्ह दलित मॅन असल्याचे सांगून, ते आपल्या पक्षाचा आधार असलेल्या दलितांच्या विरोधात आहेत असे मायावती म्हणाल्या.
- उत्तरप्रदेशच्या राजकीय दंगलीत समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी यांनीही उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दहशतवाद्यांची उपमा दिली.
- भाजपने उत्तरप्रदेशात मुस्लिमांना उमेदवारी द्यायला हवी होती, त्याचा भाजपाला फायदा झाला असता असे भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले.
- पंतप्रधान मोदी यांनी गंगा मातेची शपथ घेऊन उत्तर प्रदेशात वीज दिली जाते आहे की नाही, ते सांगावे - मुख्यमंत्री अखिलेश यादव
-पंतप्रधान मोदी यांच्या उत्तर प्रदेशातील वीज पुरवठ्याबद्दलच्या विधानाला अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांनी विजेच्या तारांना हात लावून त्यात करंट आहे की नाही, हे तपासून पाहावे, असे म्हणत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
-आम्ही वाराणसीत २४ तास वीज देत आहोत. पंतप्रधान खोटी विधाने करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी गंगा मातेची शपथ घेऊन उत्तर प्रदेशात वीज दिली जाते आहे की नाही, ते सांगावे, असे आव्हान अखिलेश यादव यांनी दिले आहे.
- राम मंदिर नसेल तर विकास, रोजगार, शिक्षण कशालाच अर्थ नाही - विनय कटियार, भाजपा नेते