UP Election 2017 : आज जाहीर होणारे एक्झिट पोल शास्त्र की जुगार

By admin | Published: March 9, 2017 11:31 AM2017-03-09T11:31:01+5:302017-03-09T11:54:57+5:30

एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत अनेकजण शंका उपस्थित करतात. एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा मानायचा असा अनेकांचा प्रश्न असतो.

UP Election 2017: Exit Polls to be announced today | UP Election 2017 : आज जाहीर होणारे एक्झिट पोल शास्त्र की जुगार

UP Election 2017 : आज जाहीर होणारे एक्झिट पोल शास्त्र की जुगार

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 9 - उत्तरप्रदेशमध्ये काल सातव्या अखेरच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आज संध्याकाळी जाहीर होणा-या पाच राज्यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागले आहे. एक्झिट पोलचा अंदाज शास्त्रोक्त पद्धतीने वर्तवण्यात येत असला तरी, काहीवेळा हे अंदाज चुकतातही. 
 
2004 लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज चुकीचा ठरलेला नाही. कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवता येत नसला तरी, बहुमताच्या जवळपास कुठला पक्ष राहिल यांचा अंदाज मात्र बरोबर ठरतो. 
 
एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत अनेकजण शंका उपस्थित करतात. एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा मानायचा असा अनेकांचा प्रश्न असतो. एक्झिट पोलमध्ये जे राजकीय पक्ष बहुमतापासून दूर असतात त्यांचे नेते कधीही एक्झिट पोल मान्य करत नाही. मागच्यावर्षीच्या एप्रिल-मे 2016 दरम्यान पाच राज्यात झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजावर नजर टाकली तर, तामिळनाडूचा अपवाद वगळता अन्य राज्यातील एक्झिट पोल बरोबर ठरले होते. 
 
आसाममध्ये भाजपा, केरळमध्ये डावे, पुडुच्चेरी आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस सत्ता येईल हा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज बरोबर ठरला होता. तामिळनाडूच्या बाबतीत मात्र सर्वच एक्झिट पोलचा अंदाज चुकला. प्रस्थापित सरकार विरोधात लाटेमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुकची सत्ता जाईल आणि करुणानिधी यांच्या द्रमुकची सत्ता येईल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी अण्णाद्रमुक 136 आमदारांसह बहुमताने सत्तेत आला. 
 
2015 मध्ये बिहारचा अंदाचही चुकला होता. त्यावेळी बहुतांश एक्झिट पोल्सचा लालू-नितीश आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज होता. भाजपाला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात भाजपाला 100 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि लालू-नितीश आघाडीने 178 जागा मिळवून सत्ता मिळवली.  
 

Web Title: UP Election 2017: Exit Polls to be announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.