UP Election 2017 - गेस्ट हाऊसकांडामुळे मायवतींच्या मनात यादव कुटुंबाबद्दल 'खुन्नस'
By admin | Published: March 10, 2017 09:09 AM2017-03-10T09:09:23+5:302017-03-10T09:16:44+5:30
सपा-बसपा आघाडीच्या चर्चा सुरु असताना या निमित्ताने 22 वर्षापूर्वीच्या गेस्ट हाऊसकांडाच्या आठवणीही अऩेकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 10 - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गरज पडल्यास मायावती यांच्या बसपासोबत आघाडी करण्याचे संकेत दिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या संभाव्य आघाडीबद्दल चर्चा सुरु झाली आहे. या निमित्ताने 22 वर्षापूर्वीच्या गेस्ट हाऊसकांडाच्या आठवणीही अऩेकांच्या मनात ताज्या झाल्या आहेत. गेस्ट हाऊसकांडाचा राग आजही मायवतीच्या मनात असेल तर ही आघाडी अशक्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
या गेस्ट हाऊसकांडानंतरच मायावती आणि मुलायम परस्परांचे कट्टर हाडवैरी बनले. त्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीआधी किंवा नंतर कधीही आघाडी झाली नाही. 1993 साली मुलायमसिंह यादव यांनी बसपाचे तत्कालीन सुप्रीमो काशीराम यांच्यासोबत आघाडी केली होती. त्यावेळी उत्तराखंड उत्तरप्रदेशमध्ये होते. राज्यात विधानसभेच्या एकूण 422 जागा होत्या. समाजवादी पक्षाने 256 आणि बसपाने 164 जागा लढवल्या. सपाला 109, बसपाला 67 जागा मिळाल्या. बसपाच्या पाठिंब्याने मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री बनले. त्यानंतर मायावतींनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मुलायमसिंह यादव सरकार अल्पमतात आले.
पाठिंबा काढल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढलेला असताना 2 जून 1995 रोजी मायावती लखनऊच्या ज्या स्टेट गेस्ट हाऊसमध्ये उतरल्या होत्या, तिथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला. गेस्ट हाऊसच्या खोली नंबर एकमध्ये मायवतींची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास सपा कार्यकर्त्यांनी गेस्टहाऊसवर अचानक हल्ला केला.
हल्ला करणारे बसपाला धडा शिकवण्याची धमकी देत होते. मायावतींना शिव्याशाप दिले. अनेक तास मायावतींना एक बंद खोली रहावे लागले. या घटनेनंतर मायावती आणि मुलायम दोघेही परस्परांचे कट्टर हाडवैरी बनले. आजतागयत हे शत्रुत्व कायम आहे.