UP Election 2017 - निकालाचं गणित सुटता सुटेना, ही आहेत मुख्य कारणे

By admin | Published: March 8, 2017 03:04 PM2017-03-08T15:04:16+5:302017-03-08T15:50:36+5:30

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज बांधणं कठीण जात आहे

UP Election 2017 - Mathematics for the purpose of exemptions, the main reasons for this | UP Election 2017 - निकालाचं गणित सुटता सुटेना, ही आहेत मुख्य कारणे

UP Election 2017 - निकालाचं गणित सुटता सुटेना, ही आहेत मुख्य कारणे

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे नेमके कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज बांधणं कठीण जात आहे. अनेक राजकीय तज्ञांकडे याचं उत्तर नसून यावेळी कोणता पक्ष बाजी मारेल काही सांगता येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत मतदान पुर्ण होण्याआधीच काय निकाल असेल याचा अंदाज लावण्यात आला होता, मात्र यावेळी हे अंदाज सपशेल खोटे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2007 मध्ये मायावतींनी जोरदार मुसंडी घेत निवडणूक जिंकली होती, तर दुसरीकडे 2012 मध्ये अखिलेश यादव यांची सायकल विजयी मार्गावर घेऊन गेली होती. 
 
मात्र यावेळी निवडणुकीच्या निकालाचं भाकीत करणं कठीण असल्याची कारणे - 
 
1) 2007 आणि 2012 रोजी प्रादेशिक पक्ष समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात थेट लढत असल्याने निकालाचा अंदाज लावणं सोप होतं. मात्र 2017 मध्ये दृश्य एकदम उलट असून राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात उलटफेर झाला आहे. ज्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणं तितकं सोपं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. 
 
2) यावेळी मतदानाच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जातीवादाच्या नावाखाली भडकाऊ वक्तव्य करत मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी तो यशस्वी झाला असलेला दिसत नाही. भाजपाने अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रचार केला असून यादव आणि मुस्लिमांनी त्यांना उत्तर दिलं नसलं तरी मतदान टक्केवारी वाढवत उत्तर दिलं आहे.
 
3) राष्ट्रीय पक्ष पुन्हा एकदा उत्तरप्रदेशच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करताना दिसत आहे. 2014 निवडणुकीत भाजपाने आपलं अस्तित्व सिद्ध केलं होतं. 2014 मध्ये असलेला भाजपाचा मतदानाचा टक्का 15 वरुन 42 टक्क्यांवर पोहोचला होता. 2007 मध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने 30.43 टक्के मतं मिळवत 403 जागांच्या विधानसभेतील 206 जागा जिंकल्या होत्या. याचप्रमाणे 2012 मध्ये अखिलेश यादव यांनी 224 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. 2017 मध्ये भाजपाचं तगडं आव्हान समोर असून सध्या मोदींचा करिश्मा सर्वच राज्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. भाजपा समोर असतानाही दोन्ही प्रादेशिक पक्ष भक्कम परिस्थितीत आहेत. राजकीय तज्ञांनुसार मायावतींना लोकांकडून छुपा पाठिंबा मिळत आहे. 
 
4) या निवडणुकीत महत्वाच्या पक्षांनी हातमिळवणी केली असून राजकारणातील नवी समीकरणं समोर आली आहेत. काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी फार कमी वेळा एकत्र येऊन प्रचार केला असला तरी अनेकांमध्ये याबद्दल कुतुहूल आहे. 2012 मधील मतदानाचा टक्का पाहिला तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मिळून 40 टक्के मतं होती.
 
5) महत्वाचे मुद्दे - 
- नोटाबंदीचा मुद्दा जरी उपस्थित करण्यात आला असला तरी त्याचा कोणत्याही पक्षावर परिणाम होईल असं वाटत नाही. 
- वादग्रस्त आणि भडकाऊ भाषणं करुनदेखील प्रचारात उतरण्यापासून त्यांना रोखण्यात आलं नाही. 
- अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव एक नेत्या म्हणून मैदानात उतरल्या आणि बैठका घेत कमान आपल्या हाती घेतली. 
- भाजपाने निवडणुकीत एकही भाजपा उमेदवार उतरवलेला नाही. तसंच मतदान केंद्रावर बुरखा घालून आलेल्या मतदारांची तपासणी करण्यासाठी महिलांना तैनात करण्यात यावं अशी मागणी केली आहे.
 
6) मोदींनी 2014 मध्ये तरुणांच्या रुपाने नवी व्होट बँक उभी केली आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांचादेखील शहरी आणि ग्रामीण भागात महत्वाचा वाटा असून त्याचं रुपांतर मतदानात होऊ शकतं. तसंच पत्नी डिंपल यांना प्रचारात उतरवून महिलांना आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरलं आहेत. 
 
7) निवडणूक ही पक्षाकडून लढवली जात असली तरी त्याच्या प्रमुख नेत्याकडे पाहूनच मत दिलं जातं. त्याचप्रमाणे या निवडणुकीत मतदार कोणत्याही पक्षाला मत देत नसून नरेंद्र मोदी, अखिलेश यादव आणि मायावती यांना मतदान करत आहेत.  
निवडणुकीत निकाल काय येईल हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. काहीजण भाजपाला पुर्ण बहूमत मिळणार असल्याचं सांगत असे तरी या तिरंगी लढतीत समाजवादी पक्षाला दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. काहीजण मायावती यादेखील निकालाचं रुपडं पालटतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. आता नेमका काय निकाल लागतो ते 11 मार्चला कळेल, तोपर्यंत अंदाजच लावले जातील.
 

Web Title: UP Election 2017 - Mathematics for the purpose of exemptions, the main reasons for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.